मुख्यमंत्र्यांसोबतची पैज सुजय विखे पाटील हरले!
अहमदनगर : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागली आहे. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलं आहे. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन”, असा विश्वास अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. सुजय विखे यांना दोन लाखांची निर्णायक आघाडी मिळाली असून […]
अहमदनगर : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागली आहे. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलं आहे. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन”, असा विश्वास अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. सुजय विखे यांना दोन लाखांची निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. इथे त्यांना राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप मैदानात होते.
राज्यात युतीच्या 42 जागा येतील, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना 38 जागांचा आकडा सांगितला होता. आताचा कल पाहता मुख्यमंत्र्यांचा अंदाज खरा ठरतोय, असं दिसतंय,’ असं सुजय म्हणाले.
“हा विजय मी माझे आजोबा बाळासाहेब विखे यांना अर्पण करतो. मला पाडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काहीजण मतभेद विसरुन माझ्याविरोधात एक झाले. पण नगर जिल्ह्यातील जनतेने द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिलं. नगरमध्ये विखे-पाटील ही काय ताकद आहे, हे आम्ही दाखवून दिलं आहे. ‘प्रवरा पॅटर्न’चा पुन्हा उदय झाला आहे. देशात सगळीकडं भाजपचं वातावरण आहे, तसं ते नगर जिल्ह्यातही आहे. सर्वाधिक मताधिक्यातून इथं विखेंची ताकद दिसली आहे”,’ असं सुजय म्हणाले.
‘हा विजय सुजय विखे यांचा नसून जिल्ह्यातील युवक, माता-भगिनी आणि युतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. निवडणूक काळात दिलेली सर्व आश्वासनं शंभर टक्के पूर्ण करणार. विकासाचा शब्द पूर्ण करणार,’ अशी ग्वाही सुजय यांनी दिली.
1991 च्या लोकसभेतील बाळासाहेबांच्या पराभवाचा वचपा 2019 मध्ये माझ्या विजयाने काढला असून, जनतेचे मनापासून आभार असं म्हणत सुजय विखेंनी शरद पवारांना खोचक टोला लगावला.