अहमदनगर महापौर निवडणूक, शिवसेनेचा अर्ज, राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा उमेदवार गुलदस्त्यात

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन यावेळी सत्ता स्थापन करत आहेत. यात शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असं सूत्र निश्चित झालं आहे.

अहमदनगर महापौर निवडणूक, शिवसेनेचा अर्ज, राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा उमेदवार गुलदस्त्यात
अहमदनगर महापौरपदाच्या शिवसेना उमेदवार रोहिणी शेंडगे
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 3:45 PM

अहमदनगर : अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी (Ahmednagar Mayor Election) येत्या बुधवारी म्हणजेच 30 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी नगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरच ठरला आहे. शिवसेनेच्या वतीने रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा उमेदवार अद्यापही ठरला नाही. (Ahmednagar Mayor Election Shivsena Corporator Rohini Shendge files nomination NCP candidate undecided)

शिवसेनेकडून रोहिणी शेंडगेंचा अर्ज

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन यावेळी सत्ता स्थापन करत आहेत. यात शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असं सूत्र निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या वतीने नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शेंडगे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचा उपमहापौर पदाचा उमेदवार अद्यापही ठरला नाही. राष्ट्रवादी उद्या उमेदवारी अर्ज भरणार असून कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सुजय विखेंचं सूचक वक्तव्य

अहमदनगरचे मावळते महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देताना अडीच वर्षात केलेल्या कामांचं भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रेझेंटेशन दिलं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असं स्पष्ट मत सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आता भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

एकूण – 68

संबंधित बातम्या :

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

योग जुळला, तर पुन्हा एकत्र येऊ, सुजय विखेंचं सूचक वक्तव्य, नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर?

(Ahmednagar Mayor Election Shivsena Corporator Rohini Shendge files nomination NCP candidate undecided)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.