विरोधात कोण याचा विचार करत नाही, माझा विजय निश्चित : श्रीपाद छिंदम
पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अखेर मतदान केलं. प्रभाग क्रमांक नऊमध्ये छिंदमने मतदानाचा हक्क बजावला. साधारण साडेचार वाजता छिंदमने मतदान केलं. मतदान केल्यावर छिंदमने मतदान केल्याची बोटाची शाईची निशाणी दाखवली. शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छिंदमला तडीपार करण्यात आलं. मात्र शेवटच्या दोन तासात […]
पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अखेर मतदान केलं. प्रभाग क्रमांक नऊमध्ये छिंदमने मतदानाचा हक्क बजावला. साधारण साडेचार वाजता छिंदमने मतदान केलं. मतदान केल्यावर छिंदमने मतदान केल्याची बोटाची शाईची निशाणी दाखवली. शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छिंदमला तडीपार करण्यात आलं. मात्र शेवटच्या दोन तासात छिंदमला मतदान करण्याची मुभा दिली होती.
मतदानानंतर बोलताना छिंदमने प्रशासनाने हद्दपार केले तरी मतदानाचा अधिकार दिल्याने आभार मानलेत. कोणाला संपवायचं आणि कोणाला राजकारणात जीवंत ठेवायचं हे मतदार ठरवत असल्याचं छिंदम म्हणाला. माझ्या विरोधात कोण उमेदवार आणि पक्ष माझ्या विरोधात आहे याची मी पर्वा करत नाही. मतदार हा राजा असून विजय निश्चित असल्याचा दावा छिंदमने केलाय.
शिवरायाबददल बेताल वक्तव्य केल्याने छिंदमच्या विरोधात राज्यभरात निदर्शने झाली होती. त्यातच यंदा तो सपत्नीक निवडणूक रिंगणात उतरलाय. मात्र छिंदम या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवतोय. छिंदमच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि आघाडीचे उमेदवार आहेत.
छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा
मतदानाला सकाळी 7.30 ला सुरुवात झाली. तर सकाळी मतदान सुरुवात होण्याआधीच माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने ईव्हीएमची पूजा केली. विशेष म्हणजे ब्राह्महणाच्या हातून ही पूजा करण्यात आली. छिंदम वार्ड क्रमांक 9 मधून अपक्ष उभा आहे, तर पत्नी 13 मधूम आपलं नशीब अजमावत आहे. तसेच छिंदमवर ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचं त्वरित निलंबित करणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
महापालिका निवडणुकीसाठी अहमदनगरमध्ये मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. गुन्हेगारी कारणांमुळे चर्चेत असेलल्या नगर महापालिकेच्या 68 जागांसाठी निकाल उद्या लागणार असून हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरची जनता महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाकडे देणार याचा निर्णय उद्या होणार आहे.