नगर महापौर निवडणूक: तिसऱ्या नंबरवरील भाजपचा दावा, कर्डिलेंकडे लक्ष

अहमदनगर: अहमदनगरला महापौर आणि उपमहापौर निवडणूक चुरस पहायला मिळतेय. सध्या महापौरपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे भाजपा आमदार शिवाजी कार्डिलेंच्या भूमिकेकडे  सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवाजी कर्डिलेंचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनाच छुपी मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आणि सुनेचा पराभव झाल्याने सर्व […]

नगर महापौर निवडणूक: तिसऱ्या नंबरवरील भाजपचा दावा, कर्डिलेंकडे लक्ष
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

अहमदनगर: अहमदनगरला महापौर आणि उपमहापौर निवडणूक चुरस पहायला मिळतेय. सध्या महापौरपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे भाजपा आमदार शिवाजी कार्डिलेंच्या भूमिकेकडे  सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवाजी कर्डिलेंचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनाच छुपी मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आणि सुनेचा पराभव झाल्याने सर्व सूत्र हे कर्डिलेंच्या हातात गेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कर्डिले काय चमत्कार करणार हे पाहणं महत्वाचे आहे. नगरमध्ये पुन्हा सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण पहायला मिळणार अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरु आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. सर्वाधिक जागा असलेल्या शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी महापौरपदाचा तर गणेश उर्फ उमेश कवडे यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दुसऱ्या क्रमांकावर 18 जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला आहे.

त्याचबरोबर 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपकडून बाबासाहेब वाकळे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या मालन ढोणे यांनी अर्ज दाखल केला.

श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात नगर महापालिकेत जाणार

महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मोठा पेच निर्माण झालाय. सत्तेसाठी 35 नगरसेवकांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे. भाजप नगरसेवकांची संख्या फक्त 14 असताना भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी दावा केला जात आहे. 35 ही मॅजिक फिगर भाजप कशी जमवणार हे जरी गुलदस्त्यात असलं, तरी सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला आहे. आता दावा कितपत सार्थ ठरतो हे अवघ्या काही तासातच कळणार आहे.

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 

शिवसेना – 24

राष्ट्रवादी -18

भाजप -14

काँग्रेस – 5

बसपा – 04

समाजवादी पक्ष – 01

अपक्ष 2

एकूण – 68

संबंधित बातम्या 

अहमदनगर आणि धुळे महापालिकेचा अंतिम निकाल  

अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!    

श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात नगर महापालिकेत जाणार  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.