चौकशी जयंत पाटलांची अन् निशाणा रोहित पवारांवर; राम शिंदे नेमकं काय म्हणाले?

Ram Shinde on Rohit Pawar : जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर बोलताना रोहित पवारांवर निशाणा; राम शिंदे यांची सविस्तर प्रतिक्रिया

चौकशी जयंत पाटलांची अन् निशाणा रोहित पवारांवर; राम शिंदे नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 5:20 PM

अहमदनगर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ईडी चौकशीवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. तर सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे.

ईडीच्या चौकशी अशा पद्धतीने लागते त्याच्यावरती अनेक दिवस चिकित्सा केली जाते. ज्यावेळी संशयात्मक काही गोष्टी आढळून येतात. त्याचवेळी ईडीची चौकशी लागते. चुकीचं केलं असेल तर सजा ही भोगावीच लागेल काही केलं नसलं तर ते निर्दोष सुटतील, असं राम शिंदे म्हणाले आहेत.

अनेक लोकांना ईडीची चौकशी लागते. मात्र अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. विनाकारण लोकांसमोर हा तमाशा मांडायचा आणि आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत, असं दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण हे योग्य नाही, असं राम शिंदे म्हणालेत.

आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची पडताळणी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निकालानंतर पराभव झाला म्हणून ही कारवाई केली जात आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत जर त्यांच्यावरच कारवाई होत असेल तर काही लोकं घाबरतील. काही लोकांना भीती वाटेल म्हणून कारवाई करण्यात आली असं लोकांचं मत बनलं आहे. पवार साहेबांना जेव्हा पत्र आलं तेव्हा कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर होते. वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क केला जातो. त्यामुळे भेदभाव करणं योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले. त्यावर राम शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांचं बालिशपणाचं वक्तव्य आहे. त्यांना कर्नाटकच्या निवडणुकीवर बोलण्याचा अधिकार नाही कारण त्यांना उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यांनी निवडणुकीच्या निकालावर बोलू नये, असं राम शिंदे म्हणालेत.

तर आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील राम शिंदे यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाचा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, तर राजकीय मंडळी राजकारण करतात, असं ते म्हणालेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.