Supriya Sule : शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं; म्हणाल्या…
Supriya Sule : शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे यांचंही कौतुक केलंय. काय म्हणाल्या? पाहा नेमकं काय म्हणाल्या...

कुणाल जायकर, प्रतिनिधी अहमदनगर : 09 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरमध्ये बोलताना बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. अजित पवार गटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात येते. दोन दिवसाआधी अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. तिथे लावण्यात आलेल्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो नव्हता. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा फक्त फोटो लावला. मात्र त्यांचे विचार घेतले नाहीत. उशिरा का होईना त्यांनी फोटो लावला. मात्र यशवंतराव चव्हाण यांचा मानस पुत्र कोण? तर शरद पवार… , असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे.
शरद पवार सर्वांवर प्रेम करतात. नाशिकला त्यांनी सभा घेतली आणि यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला. माझी त्यांना विनंती आहे. यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तकं वाचून काढा. त्यांचं आरएसएसवर काय मत आहे ते बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाणच्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला. भाजपसोबत गेलेल लोक म्हणत आहेत की, शरद पवार हुकूमशाह आहेत. मी त्यांना आवाहन करते की, मोहटा देवीला या आणि शपत घेऊन सांगा. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणारच आहे. 60 लोक नांदेडला गेले हे निर्दयी सरकार आहे. यांनी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता मात्र तसं झालं नाही.
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देशात एक अदृश्य शक्ती आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील या अदृश्य शक्तीने हाफ मुख्यमंत्री केलंय! त्यांच्यावर अन्याय केलाय. मी त्यांच्यासाठी लढणार आहे. कर्तृत्वान असेल तर महाराष्ट्र न्याय देईन. मात्र वरबाडून घ्यायचं नसतं, असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक केलंय. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी पंकजा मुंडे या नेहमी शरद पवारांकडे यायच्या. निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल. तेव्हा पंकजा मुंडे यांचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे. त्या एक लढाऊ महिला आहेत. मला खरंच त्या मुलींबद्दल प्रेम वाढतं. तिचे वडील गेले आहे. तिच्या कुटुंबात कुठलाही करता पुरुष नाही. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे आपल्या मातीतील मराठी लोक. त्यांनी दिल्ली गाजवली. मुंडे महाजन जोडीने महाराष्ट्र पिंजून काढला रान उठवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही. या पुढेही दिल्ली समोर आम्ही कधीच झुकणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.