“नव्या संसदेच्या उद्घाटनाला संजय राऊतांना तिथं जायचा अधिकार मुळीच नाही”

Sujay Vikhe Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांना नव्या संसदेच्या जायचा अधिकार मुळीच नाही; भाजप नेत्याचा घणाघात

नव्या संसदेच्या उद्घाटनाला संजय राऊतांना तिथं जायचा अधिकार मुळीच नाही
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:31 PM

अहमदनगर : नव्या संसदेचं उद्घाटनावरून सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर भाजप खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांवर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही सुजय विखे यांनी निशाणा साधला आहे.

संसद भवनाच्या उद्घाटनावरून खासदार सुजय विखेंचा संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कुणी जावो न जावो, पण संजय राऊतांना तिथं जायचा अधिकार मुळीच नाही, असं ते म्हणाले आहेत.

ज्या लोकांच्या मतावर संजय राऊत खासदार झाले ते त्यांना सोडून गेले. त्यामुळे संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. शिवसेनेचे आमदार-खासदार झाले त्यांना गेल्या एक वर्षापासून शिव्या देत आहे. त्यामुळे त्यांनी संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये, असं विखे पाटील म्हणाले आहेत.

कुकडीच्या पाण्यावरून खासदार सुजय विखे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. कुकडीच्या पाण्यावरून पुणे आणि नगर जिल्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मी मागच्या एक वर्षापासून म्हणतोय राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्याच्या नेत्यांच्या विरोधात लढा उभा करायचा आहे. तेव्हा कुणीच आलं नाही. जे नगरचे राष्ट्रवादीचे लोक या विरोधात आंदोलन करतायेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे पाणी कोणत्या पक्षाच्या लोकांनी अडवलं. त्या पक्षाचे नगर जिल्ह्याचे लोक गप्प बसणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दोन हजाराची नोट बँकेत जमा करण्याचे आदेश रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीका केली आहे. नोटबंदीवरून सुजय विखे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. फक्त आरोप प्रत्यारोप यामध्ये केले जात आहेत. सर्वसामान्यांना कोणतीही झळ नाही. तर येणाऱ्या निवडणुकीत ज्यांनी सासूने ठेवले होते. त्यांना त्याची झळ बसणार आहे. अतिरेकी कारवाई रोखण्यासाठी नोटबंदीचा फायदा होईल, असं ते म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.