शहरातल्या तीन जागा जिंकून द्या, पूर्ण औरंगाबाद ताब्यात घेईन : ओवेसी
इम्तियाजचा विजय मुस्लिमांचा नाही, इथल्या प्रत्येक मतदारांचा विजय आहे. भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे, असं म्हणत त्यांनी (Aurangabad Asaduddin Owaisi) औरंगाबाद शहरातील तीन जागा जिंकून देण्याचं आवाहन केलंय.
औरंगाबाद : एमआयएमने उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Aurangabad Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत प्रचाराचाही शुभारंभ केला. महाराष्ट्रात पूर्ण औरंगाबाद ताब्यात घेईन, शहरातील तिन्ही विधानसभा जागा जिंकून द्या, इम्तियाजचा विजय मुस्लिमांचा नाही, इथल्या प्रत्येक मतदारांचा विजय आहे. भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे, असं म्हणत त्यांनी (Aurangabad Asaduddin Owaisi) औरंगाबाद शहरातील तीन जागा जिंकून देण्याचं आवाहन केलंय.
औरंगाबाद शहरातील तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी आमखास मैदानावर ओवेसींची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. मला कधी मृत्यू आला तर या औरंगबादच्या जमिनीवर यावा, इतकं मला हे शहर प्रिय आहे, असं म्हणत ओवेसींनी (Aurangabad Asaduddin Owaisi) मतदारांना साद घातली. गेल्या निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद शहरातील तीनपैकी एक जागा जिंकली होती. यावेळी एमआयएने पुन्हा एकदा औरंगाबादमधील तीन जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जंयतीनिमित्ताने त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महात्मा गांधींना गोळी मारण्याच्या आधी गांधींनी उपोषण सुरू केलं होतं, ते का तर गांधी म्हणाले, मुस्लिमांवर अत्याचार बंद केले पाहिजेत. गांधींना मारणाऱ्यांना हिरो मानता आणि गांधीचं नाव घेता. जगाला धोका देण्यासाठी हे लोक गांधींचं नाव घेतात. गांधींची 150 वी जयंती साजरी करता तर मग गांधींचा संदेश का मान्य करत नाही? या 150 वर्षात तुम्ही बाबरी मशिद पाडली नाही का? असा सवालही ओवेसींनी (Aurangabad Asaduddin Owaisi) केला.
मला सांगा 2014 पासून 2018 पर्यंत महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. कुठे मानता तुम्ही गांधी? का मारला तुम्ही गांधी? तुम्ही गांधींच्या मार्गावर चालता की गोडसेच्या मार्गावर चालता हे मला आधी सांगा. गांधीचं नाव घेऊन तुम्ही तुमचं सत्तेचं दुकान चालवत आहात, असा घणाघात ओवेसींनी केला.
संबंधित बातम्या :