आम्ही आज तटस्थ, मात्र गरज असेल तेव्हा सोबत, एमआयएमच्या आमदारांचा उद्धव ठाकरेंना शब्द
तटस्थ राहिलेल्या सदस्यांपैकी एमआयएमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा (AIMIM MLA support Uddhav Thackeray) दिला
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव (MIM MLA support Uddhav Thackeray) जिंकला. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले. या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत (MIM MLA support Uddhav Thackeray) पडली. त्यामुळे महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. मात्र तटस्थ राहिलेल्या सदस्यांपैकी एमआयएमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा (AIMIM MLA support Uddhav Thackeray) दिला.
एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे दोन सदस्य निवडून आले आहेत. विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतर आमदार मोहम्मद इस्माईल यांनी सभागृहात भाषण केले. त्यावेळी मोहम्मद इस्माईल म्हणाले, “आम्ही जरी तटस्थ राहिलो असलो, तरी मी उद्धव ठाकरेंना आश्वासन देतो की तुम्हाला जेव्हा केव्हा आमची गरज पडेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
“राज्यात 21 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या. 24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात जे काही राजकारण सुरु होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता फार चिंतेत होती. मात्र आता हे सर्व राजकारण संपलं आहे. राज्यात महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सरकार बनवले आहे. त्याचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. मी सरकार बनवल्याप्रकरणी त्यांचे आभार मानतो,” असे मोहम्मद इस्माईल (AIMIM MLA support Uddhav Thackeray) म्हणाले.
“महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केल्याने निदान राज्यातील जनता चिंतामुक्त झाली. ज्या काही समस्या आहेत. ते सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचे निवारण होईल. आमचा पक्ष लहान आहे. मी एमआयएममधून निवडून आलो आहे. माझ्यासोबत आमच्या पक्षातून निवडून आलेला आणखी एक सदस्य आहे. निवडून आल्यानंतर आमच्या पक्षाच्या नेतृत्वामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही तटस्थ राहिलो असलो, तरी मी उद्धव ठाकरेंना आश्वासन देतो की तुम्हाला जेव्हा केव्हा आमची गरज पडेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असेही मोहम्मद (AIMIM MLA support Uddhav Thackeray) इस्माईल म्हणाले.
दरम्यान विश्वादर्शक ठरावावेळी 4 सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यात मनसे 1, माकप 1, तर एमआयएमच्या दोन आमदारांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसे आमदार प्रमोद पाटील, डहाणूमधून निवडून आलेले माकपचे विनोद निकोले हे दोन सदस्य तटस्थ राहिले. तसेच एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी पाठिंबा दर्शवला.