जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार जालन्याच्या राष्ट्रवादी शिक्षक संघटकावर भडकले. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत विचारल्यानंतर अजित पवारांनी कोरोना परिस्थितीबाबतची माहिती दिली. तसंच तुमचा प्रश्न मुखमंत्र्यांच्या कानावर घालतो असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार आणि उद्धव मस्के यांच्यातील हा संवाद आहे. (Ajit Pawar audio clip)
अजित पवार आणि उद्धव म्हस्के यांच्यात मोबाईलवरुन चर्चा झाली. यावेळी अजित पवार भडकल्याचं चित्र होतं. दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला?
अजित पवार – हॅलो
उद्धव मस्के – हॅलो
अजितदादा पवार – हा नमस्कार , अजित पवार बोलतोय
उद्धव मस्के – दादा मी उद्धव मस्के बोलतोय राष्ट्रवादी शिक्षक संघटना जालना
अजितदादा पवार – बोला
उद्धव मस्के – दादा विषय हाच आहे ते 20 टक्के 40 टक्क्याचा
अजितदादा पवार – हो बरोबर आहे ..तुम्ही या एकदा माझ्याकडे..राज्याची परिस्थिती काय ..करोनामुळे किती टॅक्स येतो ते सांगतो..म्हणजे तुमच्याही लक्षात येईल
उद्धव मस्के – आता असे झालय आता आमचे शिक्षक आमदार काळे साहेबांना आता बाहेर तोंड काढायला जागा नाही अशी परिस्थिती, त्यांनी 30 तारखेपर्यंत मुदत दिली होती.
अजित पवार – बरोबर आहे ना….ज्या वेळेस आपण शब्द दिलेला होता त्यावेळेस साहेब करोना नव्हता. आपण शब्द दिला त्यावेळेस करोना नव्हता…करोनाच्यामुळे आपलं साडे चार लाख कोटी रुपये वर्षाचे उत्पन्न आलंय अडीच लाख कोटींवर. दोन लाख कोटीं आपले कमी झालं.
उद्धव मस्के – दादा आम्हाला असं वाटतंय की आता ते दोन – चार महिन्यापासून एसटी महामंडळाला पगार थांबले होते तुम्ही साडे पाचशे कोटी रुपये उपलब्ध करुन दिलेत…आणि पंधरा पंधरा वर्षांपासून शिक्षक उपाशी आहेत दादा
अजित दादा – ठीक आहे तुमचा निरोप मुख्यमंत्र्याना देतो. मुख्यमंत्र्याना आपला निरोप देतो…मुख्यमंत्र्यांना तुमचा निरोप देतो …बस झालं
उद्धव मस्के – बरं बर दादा…
सवांद संपला
(Ajit Pawar audio clip)
संबंधित बातम्या
Ajit Pawar on Padalkar| लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार