Ajit Pawar : अजितदादा रागावतात तेव्हा..! आवाज चढवून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला अजित पवारांनी दरडावलं, पाहा VIDEO

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. चंद्रपूर शहरात पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या शेतात झालेले नुकसान या सर्वांची त्यांनी पाहणी केली.

Ajit Pawar : अजितदादा रागावतात तेव्हा..! आवाज चढवून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला अजित पवारांनी दरडावलं, पाहा VIDEO
पदाधिकाऱ्याला फटकारताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:43 PM

चंद्रपूर : चंद्रपूर दौऱ्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) फटकळ स्वभावाचा आवाज चढवून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला फटका बसला आहे. जे आवडले नाही ते थेट तोंडावर सांगण्याची अजित पवारांची शैली आहे. त्याप्रमाणे एक प्रसंग अजित पवारांच्या चंद्रपूर दौऱ्यात पाहायला मिळाला. खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या निवासस्थानाहून गाडीत बसताना त्यांनी दीपक जयस्वाल या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला गाडीत बसायचा इशारा केला होता. मात्र अजित पवार यांनी आपल्याकडे लक्षच दिले नसल्याची जयस्वाल यांनी तक्रार केली. त्यावर ‘असं बोलायचं नाही, माझं सर्वांकडे लक्ष असतं’ असे म्हणत दादा यावेळी रागावलेले पाहायला मिळाले. शहरात पवारांच्या पूर दौऱ्याचा काँग्रेस पक्षाने बॅनर वर्षाव करून इव्हेंट केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते (Chandrapur NCP) नाराज झाले आहेत. त्यातच त्यांनी शहराच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला फटकारल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. चंद्रपूर शहरात पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान, पूर परिस्थितीला कारणीभूत घटक, शेतकऱ्यांच्या शेतात झालेले नुकसान या सर्वांची त्यांनी पाहणी केली. राज्य सरकारने तत्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे मदत लवकर मिळावी, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडिओ –

‘इथे पक्षवाढीसाठी जीवाचे रान करतोय’

या सर्व धावपळीत अजित पवारांच्या फटकळ बोलण्याचा फटका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला बसला. खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानाहून गाडीत बसताना त्यांनी दीपक जयस्वाल या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला गाडीत बसायचा इशारा केला होता. मात्र तुमचे लक्षच नव्हते, असे प्रत्युत्तर त्या पदाधिकाऱ्याने दिले. तेव्हा अजित पवार रागावलेले पाहायला मिळाले. मी इथे पक्षवाढीसाठी जीवाचे रान करतोय, असे ते गाडीत बसल्यावर रागाने बोलले. दरम्यान, काँग्रेस खासदाराच्या घराच्या दारात दादांनी पक्षाच्या शहराच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला फटकारल्याने याविषयी चर्चा सुरू झाली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.