दुसऱ्यांच्या सभांमुळे भाजपवाल्यांना सोडा बाटल्या द्यावा लागतात : अजित पवार
इंदापूर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवरुन भाजपवर निशाणा साधला. “राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक येतात, तुमच्या येतात का? तुमच्या सभा ऐकायला लोकांनी आलं पाहिजे म्हणता, पण दुसर्यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला सोड्याची […]
इंदापूर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवरुन भाजपवर निशाणा साधला. “राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक येतात, तुमच्या येतात का? तुमच्या सभा ऐकायला लोकांनी आलं पाहिजे म्हणता, पण दुसर्यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते”, असे टोलेबाजी अजित पवार यांनी केली. ते इंदापुरात बोलत होते.
राज ठाकरे पाच वर्षापूर्वी आमच्याविरोधात सभा घ्यायचे, मोदींचे समर्थन करायचे, आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला का? ते कुठून पैसे आणतात विचारलं का? असे सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले.
बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यात तब्बल चार सभा घेऊन, आघाडीच आपल्याला न्याय देऊ शकते, असे सांगत सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
हवा बदलायला लागली – अजित पवार
“कोल्हापूर इथे शिवसेनेची पहिली सभा झाली. या ठिकाणच्या सभेला जमलेल्या महिलांना मराठी बोलता येत नव्हते, त्या कर्नाटकमधून आणल्या होत्या. यांच्या सभेला आता लोक जमत नाहीत. हवा बदलायला लागली आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटायला लागलं आहे. लोकशाही आहे, आम्ही ती खुल्या मनाने स्वीकारली आणि विरोधकांची भूमिका घेतली. मात्र आता हे लागलेत गाजर दाखवायला”, असा घणाघात त्यांनी केला.
ईव्हीएम मशीन जरा गडबडच – अजित पवार. मायावतीसह सर्वच जण EVM मध्ये बिघाड होतोय असे सांगतात. खरं तर ईव्हीएम हे अमेरिका सुद्धा आता चालवत नाही. ईव्हीएममध्ये जरा गडबडच वाटत असून, आपणही मतदान करताना अगोदर चेक करा, नाहीतर बटण दाबताच ते तिसरीकडेच मतदान व्हायचे, असे सांगून त्यांनी ईव्हीएमबाबतही शंका उपस्थित केली.