अशोक चव्हाणांसोबत झालेल्या खडाजंगीवर अजित पवार म्हणतात…

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या वृत्तावर स्वतः अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News).

अशोक चव्हाणांसोबत झालेल्या खडाजंगीवर अजित पवार म्हणतात...
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 12:09 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या वृत्तावर स्वतः अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News). काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं. काँग्रेसच्या खातेवाटपाचा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सांगतील त्याप्रमाणे होईल आणि शिवसेनेबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याने तेच यावर निर्णय घेतील, असंही त्यांनी नमूद केलं (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News).

अजित पवार म्हणाले, “काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी आहे. मी त्या वृत्तपत्राच्या संपादकांशी बोललो. त्यांच्या इतर सहकाऱ्यांशीही बोललो. तुम्ही माझ्या बोलल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याशी बोला. अशोक चव्हाण यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मी ही बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्राच्या प्रमुखांशी बोललो. संपादकांशी बोललो.”

ज्या पत्रकाराने बातमी दिली त्या पत्रकारांनी अद्याप फोन उचलला नाही. मी त्यांनाही विचारणार आहे. त्यांच्याकडे जर दुसऱ्या बातम्या देण्यासाठी नसतील तर ठिक आहे. पण इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासहार्यता कमी होईल, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“भांडायचं, वाद घालायचं कारण काय?”

अजित पवार यांनी पुरातनवर झालेल्या खातेवाटपाच्या बैठकीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, “एकतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही बैठकीला नव्हते. गुरुवारी (2 जानेवारी) पुरातनच्या बैठकीत मी, जयंत पाटील, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हजर होते. सर्व माध्यमं बाहेर होती. आमचा चेहरा पाहून कुणाला तरी असं वाटले का आमचं भांडण झालं. यात भांडायचं वाद घालायचं कारण काय? राष्ट्रवादीला जी खाती मिळाली ती मिळालीच आहेत. अजून एक महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार होतं, ते विस्तारवाढीला देण्याचं ठरलं होतं.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.