नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत,अजित पवारांचा भाजपला टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला विविध मुद्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Ajit Pawar BJP)

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत,अजित पवारांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 5:42 PM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मराठा आरश्रण, ओबीसींचे प्रश्न, विधानपरिषदेचा निकाल, मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्च यावरुन अजित पवारांनी महाविकासआघाडीची बाजू जोरकसपणे मांडली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नेते पाच जागा निवडून येण्याचा दावा करत होते. मात्र, त्यांची एकच जागा निवडून आली. भाजपला पदवीधरच्या लोकांनी केलेला पराभव झोंबल्याची टीका अजित पवारांनी केली. (Ajit Pawar criticize BJP in  Maharashtra Assembly)

विधानपरिषदेच्या निकालावरुन भाजपला टोला

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी बोट ठेवले. “तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने त्यांना दुःख झालंय.हे सरकार सहा महिन्यात सहा महिन्यात जाईल गेलं नाही, असं ते सांगत होते. मात्र, वर्ष होऊनही सरकार गेलं नाही.” आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप नेते पाचही जागांवर निवडूण येण्याचे दावे करत होते. “आमच्या पाच येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल, असे दावे ते करत होते.पण, निकाल वेगळे लागले. नागपूरच्या जागेवर भाजप तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते भाजपच्या लोकांना खूप झोंबलंय”, अशी कोपरखळी अजित पवारांनी भाजप नेत्यांना लगावली. (Ajit Pawar criticize BJP in  Maharashtra Assembly)

नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटतायत, असा टोला अजित पवारांनी लगावला. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पुण्याला चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते. पण, आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. औरंगाबादला सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. अमरावतीला चुकलं, पण, एक समाधान आहे तिथं भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलंय, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar criticize BJP in  Maharashtra Assembly)

अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणचा प्रश्न, ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या काळात कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, असंही ते म्हणाले.

आमच्याकडून तुमच्याकडे गेलेल्यांची काळजी करा

विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये झालेल्या इकमिंगवरुनही अजित पवारांनी निशाणा साधला. “आता मला त्यांना सांगणं आहे, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, तुम्ही बघा, त्याची काळजी करा,”असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar criticize BJP in  Maharashtra Assembly)

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?

(Ajit Pawar criticize BJP in  Maharashtra Assembly)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.