Ajit Pawar : ‘राज्यावर अतिवृष्टीचं संकट, सत्ताधारी फाईव्हस्टार हॉटेलात जेवणावळी उठवताहेत’, अजित पवारांचा घणाघात; दोघांचीच मनमानी सुरु असल्याचा आरोप

राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांच्या जेवणावळी उठवत आहेत. हे बरोबर नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.

Ajit Pawar : 'राज्यावर अतिवृष्टीचं संकट, सत्ताधारी फाईव्हस्टार हॉटेलात जेवणावळी उठवताहेत', अजित पवारांचा घणाघात; दोघांचीच मनमानी सुरु असल्याचा आरोप
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:24 PM

पुणे : राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीय. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्यात. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) अहवालनानुसार मागील 12 दिवसांत राज्यात 89 जणांचा बळी गेलाय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांच्या जेवणावळी उठवत आहेत. हे बरोबर नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.

‘राज्यात सध्या दोघांचीच मनमानी सुरु’

राज्यातील पूरस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने जाहीर केलाय. त्यावरुनही अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय. सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना अचानक रद्द करणं पूर्णपणे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. कशाच्या आधारे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला हे मी विचारणार. न्यायव्यवस्थेनं सांगितलं आहे ज्या निवडणुका ठकल्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत. अधिवेशनही पुढे ढकललं. राज्यात सध्या दोघांचीच मनमानी सुरु आहे, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केलीय.

‘लोकशाहीची थट्टा लावलीय, खून पाडला जातोय’

आपण राज्यघटनेला मानून पुढे जातो, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत. देशात कायद्याचं राज्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली आहे. मात्र या ठिकाणी लोकशाहीची थट्टा लावली आहे, लोकशाहीचा खून पाडला जातोय, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय. तसंच ‘आज आपलं सरकार नाही, आपण विरोधी पक्षात आहे आणि आपली ताकद कमी आहे. शिंदे आणि फडणवीस अजून मंत्रिमंडळ स्थापन करत नाहीत, अरे बाकीच्यांना घ्या ना, 42-43 जणांचं मंत्रिमंडळ करता येतं. मी स्पष्ट बोलतो पण दुजाभाव केव्हा केला नाही. या सरकारचा निर्णय बघा, सदस्य एका विचाराचा आणि सरपंच वेगळ्या विचाराचा, दोघं कसं काम करणार? अडचणी येतात. राष्ट्रपतीची निवडणूक आहे आता आमदार, खासदार मतदान करतात, देशातील जनता या निवडणुकीला मतदान करते का? असा सवाल ही अजित पवारांनी उपस्थित केलाय. जे आरक्षण काढायचं ते काढा याबद्दल दुमत नाही, मात्र डायरेक्ट सरपंच निवडून द्यायचा, त्यामुळे नागरिकांवर अन्याय होतो, असा दावा अजितदादांनी केलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.