वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय?; सुप्रिया सुळे यांनी विचारला अडचणीचा सवाल

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय?; सुप्रिया सुळे यांनी विचारला अडचणीचा सवाल
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 12:45 PM

केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं आहे. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. तर केंद्र सरकार हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अजितदादा अल्पसंख्याकांबाबतची भूमिका सातत्याने मांडत असतात. त्यामुळेच अजितदादा गटाला खिंडीत पकडण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी हा सवाल केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितदादा गटाला हा सवाल केला आहे. वक्फ बोर्डचं विधेयक कालच मांडलं गेलं. या विधेयकावर सर्व विरोधकांनी प्रचंड आक्षेप घेतला आहे. हे बिल मागे घ्या म्हणून सांगितलं जात आहे. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचं वक्फ बोर्डाच्या बिलावर एकमत असल्याचं आम्ही ऐकलेलं नाही, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला. अजित पवार यांचा या विधेयकाबाबतचा स्टँड आम्हाला कळला नाही. ते या विधेयकाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे अजून कळलेलं नाही, असं सांगतानाच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांनीही या विधेयकावर फेरविचार करण्याची सूचना केली आहे. त्याचं आम्ही आभार मानते, असं त्या म्हणाल्या.

त्यांनाच बोलण्याचा अधिकार

लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. हा चुनावी जुमला आहे हे बोलण्याचा हक्क त्यांना आहे. छगन भुजबळ स्वतः म्हणत होते की, त्यांनी असं बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. गरिबांसाठी ज्या योजना आलेल्या आहेत त्या काँग्रेसने केल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना काँग्रेसने केली. नरेगा काँग्रेसने आणलेली योजना आहे. सर्व नियम आणि कायदा हे काँग्रेसने केलेले आहेत, असं त्या म्हणाल्या.

पवार विरुद्ध पवार होणार का?

बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवणार आहोत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचे कुणाला नाही? याचा निर्णय सर्व्हे, चर्चा करून घेतील. तसेच लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांचा मानसन्मान म्हणून आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. खासकरून उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली पाहिजे, असंही ठाकरे गटाकडून बोललं जात आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, असं त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...