Ajit Pawar : स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला, अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अमित शाह (Amit Shah) अहमदनगरमधील प्रवरानगर मध्ये आहेत. तर, आज सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत.

Ajit Pawar : स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला, अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन
अजित पवार अमित शाह
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:20 PM

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अमित शाह (Amit Shah) अहमदनगरमधील प्रवरानगर मध्ये आहेत. तर, आज सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. आज आणि उद्या अमित शाह पुण्यात असतील. अमित शाहांचा पुण्यातील मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये असेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)त्यांचा राखीव सूट दिला मुक्कामासाठी अमित शाहांना देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती (Maharashtra Political Culture ) किती समृद्ध आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

अजित पवारांनी स्वत:हून सूट दिला

अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट गृहमंत्र्यांसाठी दिला आहे. अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर,दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शाह यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिलाय.

गृहमंत्री अमित शाहांचा मुक्काम अजित पवारांच्या ‘सूट’मध्ये,

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाउसमध्ये त्यांच्या ताब्यातील सूट उपलब्ध करून दिलाय. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने हा सूट त्यांना देण्यात येतो. अजित पवार दर शुक्रवारी, शनिवारी याच ठिकाणी बैठका घेतात.

सहकार मंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.

इतर बातम्या:

Radhakrishna Vikhe | राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले, पण त्यांनी सहकाराबद्दल काहीच नाही केले; विखे-पाटलांचे शरसंधान

Patan : शंभुराज देसाई जिल्हा बँकेच्या पराभवाचा वचपा काढणार? नगरपंचायतीच्या रणधुमाळीत घड्याळ गायब, पाटणकर गटाचं NCP पुरस्कृत पॅनेल मैदानात

Ajit Pawar gave his suit to Union Cooperative Minister Amit Shah for Maharashtra Pune Visit

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....