हार्दिक पटेल पिछाडीवर का होते? अजित दादा म्हणाले आश्चर्य वाटलं…आणि थेट विश्लेषणचं करून टाकलं…
निवडणूक आयोग लवकरच कुणाला किती मते मिळाली हे जाहीर करेल, जे निवडून आले त्यांनी आता कामाला लागले पाहीजे, आणि जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नका पुन्हा कामाला लागा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
मुंबई : नुकतेच गुजरात विधानसभेचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देतांना थेट विश्लेषणच करून टाकलं आहे. अजित पवार गुजरात निवडणुकीच्या यशावर बोलत असतांना त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलचे उदाहरण देऊन बंडखोरी करणाऱ्यांना टोमणा मारला आहे. हार्दिक पटेल याने स्वतःचे एक वलय निर्माण केले होते, त्यामुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या काही महीने अगोदर त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कधीकाळी मोदींवर हल्लाबोल करणारा युवा नेता म्हणून हार्दिक पटेलची ओळख झाली होती. तोच धागा पकडून अजित पवार यांनी हार्दिक पटेल पिछाडीवर पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
हार्दिक पटेल याने पक्षांतर केल्यामुळे पराभूत होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही, पिछाडीवर राहण्याची वेळ त्याच्यावर आली असा टोला लगावला आहे.
निवडणूक आयोग लवकरच कुणाला किती मते मिळाली हे जाहीर करेल, जे निवडून आले त्यांनी आता कामाला लागले पाहीजे, आणि जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नका पुन्हा कामाला लागा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
पाटीदार समाजाचा नेता म्हणून हार्दिक पटेल याने आपली ओळख निर्माण केली होती, त्याच्या भोवती एक वलय निर्माण झाले होते त्याची ओळखही चांगली झाली होती असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
हार्दिक पटेल यांनी पक्षांतर केल्यामुळे लोकांना त्यांना फार प्रतिसाद दिला असे नाही, लोकांनी प्रतिसाद दिला असं असतं तर पिछाडीवर किंवा पराभूत होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली नसती असंही अजित पवार यांनी विश्लेषण केले आहे.