Ajit Pawar Gadchiroli : ‘फुल्लफ्लेज्ड मंत्रिमंडळ आलं तरच…’ शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं का म्हणाले अजित पवार?
अजित पवार (Ajit Pawar) हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला भेट देऊन तेथील पूर (Floods) परिस्थितीची पहाणी केली.
गडचिरोली : अजित पवार (Ajit Pawar) हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला भेट देऊन तेथील पूर (Floods) परिस्थितीची पहाणी केली. पुराचा प्रचंड फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत झालेल्या नूकसानाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्या राज्य सरकारला देखील टोला लगावला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही. एकालाही तातडीची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांच्या नकुसानाचे पंचनामे देखील झाले नाहीत. या कामाला विलंब लागतोय कारण राज्यात सध्या केवळ दोघांचेच सरकार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या गरज आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर कामे लवकर मार्गी लागतील. पालकमंत्र्यांच्या देखरेखीखाली पंचनामे करता येतील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मदतीसाठी पाठपुरावा
पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारभार पहात आहेत. मात्र फुलफ्लेज्ड मंत्रिमंडळ आलं तरच काम नीट होऊ शकते. या पहाणी दौऱ्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्येही जाणार आहे. पंचनाम्याबाबत त्यांना विचारणार आहे. आठ दहा दिवस झाले तरी पंचनामे सुरू नाहीत, तर त्याचं कारण काय? जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्टाफ कमी आहे का, की शेतापर्यंत जाण्याची सोय नाहीये? असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सरकार सांगते, मात्र इथे कोणाचेच पंचनामे नाहीत. साधाराण दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार. पुरग्रस्तांना मदत मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुराचा जिल्ह्याला मोठा फटका
गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तब्बल 47 गावांना पुराचा फटका बसला आहे. जून पासून ते आतापर्यंत पावसामुळे झालेल्या विविध अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 76 पशूधन दगावले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.