Ajit Pawar : सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकासाकडे माझं बारकाईने लक्ष असतं – अजित पवार

वृक्षारोपणाचा चांगला उपक्रम हाती घेतला. बारामतीत कोणतही काम करताना कोणीतरी पवार असावंच लागतं. पथनाट्याचं दिग्दर्शन करणाऱ्या ओंकार पवार यांचं देखील अजित पवारांनी कौतुक केलं.

Ajit Pawar : सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकासाकडे माझं बारकाईने लक्ष असतं - अजित पवार
सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकासाकडे माझं बारकाईने लक्ष असतंImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 12:36 PM

बारामती : बारामतीला (Baramati) दर आठवड्याला येण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. ध्यानीमनी नसताना मुख्यमत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता विरोधी पक्षनेतेपदाची (Leader of the Opposition) जबाबदारी आली आहे. सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकास याकडे माझं बारकाईने लक्ष असतं. बारामतीत सोयीसुविधा असाव्यात. यासाठी प्रयत्न पुर्णपणे प्रयत्न करणार आहोत. भगिनी मंडळाने मला कधी बोलवलंच नाही. मध्यंतरी महिला मंडळाच्या पदाधिकारी भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या तुम्ही कार्यक्रमाला येतच नाही. मी म्हणालो बोलवतच नाही. मी रिकामाच असतो असं अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

वृक्षारोपणाचा चांगला उपक्रम हाती घेतला

वृक्षारोपणाचा चांगला उपक्रम हाती घेतला. बारामतीत कोणतही काम करताना कोणीतरी पवार असावंच लागतं. पथनाट्याचं दिग्दर्शन करणाऱ्या ओंकार पवार यांचं देखील अजित पवारांनी कौतुक केलं. महिलांनी मी समोर असताना न घाबरता पथनाट्य सादर केलं. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी कितीही काम केलं तरी त्याला बारामतीकरांची साथ लाभल्याशिवाय मूर्त स्वरुप येत नाही. पर्यावरणावर लावणी सादर केली. जरा नऊवारी नेसून लावणी सादर केली असती तर उपस्थितांना आनंद झाला असता. अशी अजितदादांनी मिश्किल टोलेबाजी केली.

हे सुद्धा वाचा

भगिनी मंडळाकडून देशी झाडं लावली जात आहेत

माझे पीएस सारखं लवकर उरका म्हणत होते. पण मी भगिनी मंडळाचा कार्यक्रम असल्यानं चालू द्या म्हणालो. भगिनी मंडळाकडून देशी झाडं लावली जात आहेत. त्यातून चांगला फायदा होईल. झाड लावल्यानंतर ते जगलंय का ? वाढ होतेय का याकडेही लक्ष द्या अशा सुचना त्यांनी दिल्या. पदाधिकाऱ्यांनी विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्याच्या अजितदादांच्या सुचना होत्या. पूर्वी बऱ्याच भागात माळरान होतं. पण आता सर्व बदलतं आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचा आग्रह केला आहे. पावसाळ्यात वृक्षारोपणावर भर द्या. देशी झाडे लावण्यावर भर द्या. उद्याच्या काळात हरीत बारामती बनेल यासाठी प्रयत्न करा. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यावर भर द्या. धरणांची पाणी स्थिती बदलली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम होत आहेत. माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर झाडे लावून ते प्रेम व्यक्त करा. मी ३० वर्षे तुमच्यासाठी मरमर करतोय. तुम्ही आता झाडे लावून माझ्या कामाचा मोबदला द्या असं अजित पवारांनी उपस्थितांना आवाहन केलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.