मेळघाटमधील कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतली कुपोषित बालक आणि मातांची भेट

आदिवासी समाजातल्या भगिनींशी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून आदिवासी मातांना आणि त्यांच्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

मेळघाटमधील कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतली कुपोषित बालक आणि मातांची भेट
अजित पवारांकडून मेळघाटातील कुपोषित बालकांची पाहणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 9:53 PM

अमरावती : जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर तसेच सरकारी दवाखान्याला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भेट दिली. तेथे आदिवासी समाजातल्या मातांची आणि त्यांच्या नवजात बालकांच्या तब्येतीची, त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची, औषधोपचारांची माहिती घेतली. आदिवासी समाजातल्या (Tribal Community) भगिनींशी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून आदिवासी मातांना आणि त्यांच्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. मेळघाटातील (Melghat) कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

अजित पवार म्हणाले की, मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे. मी प्रत्येकाला विचारत आहे की तुमच्यावर काही दबाव आहे का. अनेक मुलांचं वजन कमी आहे. मेळघाटातील कुपोषणासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. काही ठिकाणी मुलींची फार लवकर प्रसूती होती. अनेक ठिकाणी कुटुंब नियोजन पाहायला मिळत नाही. इथल्या लोकांना वेगवेगळी माहिती मिळत नाही. अनेक लोकांना रेशन कार्ड मिळत नाही. अनेक ठिकाणी धान्य खराब होतं. पण इथल्या लोकांना धान्यच मिळत नाही हा विरोधाभास आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, पण शेवटच्या माणसाला मिळताना ते दिसून येत नाही. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पण भारतात असाही भाग आहे, जिथं धान्य मिळत नाही, ते मिळालं पाहिजे. सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं अजितदादा यावेळी म्हणाले.

अजितदादांचा ताफा अडवला

मेळघाट दौऱ्यावर असताना अजित पवार यांचा ताफा कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अडवला. पावसाळ्यात नाल्याचं पाणी घरात घुसल्यानं या महिलांना आपला संताप व्यक्त केला. अजित पवार यांनीही त्या महिलांची बाजू ऐकून घेतली. आदिवासी समाजाला मुलभूत सोयी-सुविधाही मिळत नाहीत, अशा संतप्त भावना या महिलांनी अजित पवारांसमोर व्यक्त केली.

अजितदादांच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे माती-मुरुमाने बुजवले

अजित पवार यांच्या मेळघाट दौऱ्यापूर्वी धारणी परतवाडा रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, रस्त्यावरील खड्डे फक्त मुरुम आणि मातीने बुजवण्यात आले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.