कॅमेऱ्यासमोर सांगतो, आता महाराष्ट्रात… संजय राऊत नेमकं काय म्हणाले? कशा संदर्भात म्हणाले?
समान नागरी कायद्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिाय व्यक्त केली. ड्राफ्ट पाहू,. सामाजिक न्याय काय आहे पाहू. आदिवासी, महिला आणि सर्व धर्माबाबत काय म्हटलं आहे त्याचा अभ्यास करू. त्यानंतर त्यावर बोलता येईल, असं राऊत म्हणाले.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. अजित पवार भाजपसोबत आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांच्या या विधानाने खासकरून शिंदे गटात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत हे दिल्लीत आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. आमच्यासोबतच राहील. जनता आम्हाला साथ देणारी आहे. भाजपने राजकीय पक्षांना फोडणं सुरू केलं आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असं कधीच झालं नाही. कॅमेऱ्यासमोर सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळले. एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार आहेत. जे चाललं आहे. 16 आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांना गडबडीत घेतलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिंदे जाणार हे निश्चित
भ्रष्टाचाऱ्यांनी तुरुंगात जाव. अजित पवार तुरुंगात खडी फोडतील. भुजबळ खडी फोडतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आता खडी कोण फोडत आहे? देशाच्या राजकारणातील हा गलिच्छ प्रकार आहे, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे अपात्र होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपने फोडाफोडी केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ती मोदी-शाह यांची देण
राज्यात आयाराम गयारामची संस्कृती सुरू आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. ही मोदी- शाह यांची देण आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर देशात नैतिकतेचं राजकारण होईल असं वाटलं होतं. त्यांच्याकडून आशा होती. काँग्रेसने ते केलं नव्हतं. म्हणून काँग्रेस पराभूत झाली होती. तुम्हाला मते मिळाली. पण तुम्ही काँग्रेसपेक्षाही वाईट काम करत आहात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
अजितदादा जाणार माहीत होतं
अजित पवार जाणार हे आम्हाला माहीत होतं. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. शिंदे जाणार हेही माहीत होतं. ईडीची राजकारण आहे. आमच्या हातात दोन तासासाठी ईडी द्या. मग पाहा महाराष्ट्राचं राजकारण आम्ही बदलून दाखवतो, असंही ते म्हणाले.