अहमदनगर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद (Ajit pawar at ambalika sugar factory) आहे. दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर (Ajit pawar at ambalika sugar factory) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके तेथे कोणत्या कारणासाठी गेले याबाबत अद्याप माहिती (Ajit pawar Missing) मिळू शकली नाही.
अजित पवारांनी शुक्रवारी संध्याकाळी राजीनामा (Ajit pawar Missing) दिला. अजित पवार गुरुवारी (26 सप्टेंबर) दिवसभर बारामतीत होते. त्यांनी पूरग्रस्त भागातही दौरा केला. तर दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिवसभर मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याचं कारण अद्याप कोणलाही माहिती नाही. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांशी (Ajit pawar at ambalika sugar factory) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिराने अजित पवार नगरमधील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली (Ajit pawar at ambalika sugar factory) जात आहे. अजित पवार यांच्यासोबत कारखान्यात वीरधवल जगदाळे असल्याची माहिती मिळत आहे. जगदाळे हे पवार यांचे भागीदार आहेत.
अजित पवारांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
संबंधित बातम्या :