अजित पवार यांची डोकेदुखी कमी करण्यासाठी ठाकरेंचा शिलेदार मैदानात, बंडखोरी रोखणार ?

सचिन अहिर हे उद्या पुणे दौऱ्यावर असून ते राहुल कलाटे यांची भेट घेणार आहे. महाविकास आघाडी म्हणून यामध्ये माघार घेण्याचा आग्रह सचिन अहिर यांच्याकडून केला जाईल अशी शक्यता आहे.

अजित पवार यांची डोकेदुखी कमी करण्यासाठी ठाकरेंचा शिलेदार मैदानात, बंडखोरी रोखणार ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 4:56 PM

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत प्रचारही सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना काटे ( Nana Kate ) यांना उमेदवारी दिली आहे. असं असतांना शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार राहुल कलाटे ( Rahul kalate ) यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अजित पवार ( Ajit Pawar ) यांची डोकेदुखी वाढली आहे. राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सरळ सामना होणार आहे.

राहुल कलाटे हे महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार असल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले नाना काटे यांना फटका बसणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राहुल कलाटे यांची माघार व्हावी यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करीत आहे.

स्वतः अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल कलाटे यांची उमेदवारी माघे घेण्यासाठी विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे उद्धव ठाकरे यानं सचिन अहिर यांना राहुल कलाटे यांची भेट घेण्यास सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

सचिन अहिर हे उद्या पुणे दौऱ्यावर असून ते राहुल कलाटे यांची भेट घेणार आहे. महाविकास आघाडी म्हणून यामध्ये माघार घेण्याचा आग्रह सचिन अहिर यांच्याकडून केला जाईल अशी शक्यता आहे.

याशिवाय सचिन अहिर हे राहुल कलाटे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणं करून देण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे स्वतः कलाटे यांचा उमेदवारी अर्ज माघे घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.

अजित पवार यांची ही चाल असल्याची बोललं जात असून त्यात यश येतं का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. पण दुसरीकडे राहुल कलाटे यांनीही निवडणुकीत माघार घेणार नाही अशीच भूमिका कायम ठेवली आहे.

खरंतर चिंचवड आणि कसबा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेल्या संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते यांनी अर्ज दाखल केला आहे.

तर दुसरीकडे राहुल कलाटे हे ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात आल्याने कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी आता उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला कलाटे ऐकतात का ? हे पाहावं लागेल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.