मोठ्या गणेश मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर… अजित पवारांनी दिला गणेश मंडळांना सूचक इशारा

येत्या 10 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. नागरिकांनी साधेपणाने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नाही. मोठ्या गणपतींबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. (ajit pawar media brief on restrictions in ganesh festival)

मोठ्या गणेश मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर... अजित पवारांनी दिला गणेश मंडळांना सूचक इशारा
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 12:25 PM

पुणे: येत्या 10 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. नागरिकांनी साधेपणाने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नाही. मोठ्या गणपतींबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतीलच, असं सांगतानाच मोठ्या गणपती मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर दुसऱ्याच दिवशी कठोर निर्बंध लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (ajit pawar media brief on restrictions in ganesh festival)

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मोठ्या गणपती मंडळांना हा सूचक इशारा दिला आहे. येत्या 10 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. महाराष्ट्र आणि पुण्यात हा उत्सव मोठ्याप्रमाणावर होतो. पण यंदाही उत्साहाला आवर घाला. घरगुती गणेशोत्सव साजरा करा. पण मोठ्या गणेशोत्सावासाठी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करावी, त्या निर्णयाचं स्वागत करावं. मोठे गणेशोत्सव साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. निर्बंधांबाबत चर्चा झाली. पण कठोर निर्बंध लादणार नाही, असं सांगतानाच यंदा गणेशोत्सवानिमित्त देखाव्याचा प्रश्नच येत नाही. फारच गर्दी होत असेल तर पहिल्या दिवसांचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्बंधाचा निर्णय घेऊ, असं पवार यांनी सांगितलं.

झोपडपट्ट्यांतील लसीकरणावर भर

पुणे शहर आणि जिल्ह्यात जवळपास सात लाख लस मिळण्याची शक्यता आहे. जवळपास दहा कोटी रुपये लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार लसीकरणावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. झोपडपट्ट्यात लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बजाज ग्रुप नेहमीच सामाजिक काम करत असते. त्यांचेही त्यांनी आभार मानले.

पुण्यातील पाच तालुक्यात रुग्णसंख्या वाढली

पुण्यातील ग्रामीण भागात कोरोनाचं प्रमाण अधिक आहे. यात मागच्यावेळच्या पाच तालुक्यांचाच समावेश आहे. बारामती, इंदापूर, शिरुर आणि आंबेगावचा यात समावेश आहे. या तालुक्यात टेस्टिंग वाढवल्याने संख्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असं त्यांनी सांगितलं. जेवढं लिबरल राहता येईल तेवढं लिबरल धोरण स्वीकारत आहे. पण संख्या वाढली तर कठोर निर्बंध लावले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शाळा सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह

शाळा, कॉलेजमध्ये लसीकरण करायचे आहे. त्याला प्रतिसाद मिळतोय. शाळा सुरू करताना त्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे लसीकरण आधी करणार, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच शाळा सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह आहे. काहींचं म्हणणं दिवाळीनंतर शाळा सुरू करा, तर काहींच्या मत नंतर शाळा सुरू करण्याचं आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री संबंधित यंत्रणांशी चर्चा करूनच निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गॅसचे दर वाढले हा ‘अच्छे दिन’चा प्रकार

गॅस सिलिंडर दर वाढले हा ‘अच्छे दिन’चा प्रकार आहे, असा टोला लगावतानाच लोकांनी तेव्हा मोठ्या विश्वासाने भाजपला निवडून दिलं आहे. डिझेल शंभरी गाठत आलं आणि पेट्रोल शंभरीच्या पुढे गेलं आहे. महागाईला तोंड द्यावं लागत आहे. कोरोनामुळे लोक त्रासले आहेत. अनेकांचे रोजगार आणि नोकऱ्या गेल्या. कर्ज फेडता येत नाही, अशा अडचणीच्या काळात केंद्राने लक्ष द्यायला हवं होतं. दर नियंत्रणात ठेवायला हवे होते. त्यासाठी आंदोलने झाली. पण बदल होताना दिसत नाही, असं ते म्हणाले. (ajit pawar media brief on restrictions in ganesh festival)

संबंधित बातम्या:

महापालिकेच्या तरण तलावच्या खासगीकरणाचा घाट, नितेश राणे यांची चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्रं

राज्यातील गटसचिवांना 20 महिन्यांनंतर पगार मिळणार?; रोहित पवारांची सहकार मंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी

(ajit pawar media brief on restrictions in ganesh festival)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.