अजितदादांची NCP दिल्ली विधानसभेच्या मैदानात; पहिल्या यादीत 11 उमेदवार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी मोठी खेळी
Ajit Pawar NCP Contest Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एंट्री घेतली आहे. पक्ष येथील निवडणूक लढवत आहे. त्यासाठी अजितदादांनी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उतरला आहे. पक्ष येथील निवडणूक लढवत आहे. मेघालयानंतर आता दिल्लीच्या मैदानात अजितदादा नशीब आजमावत आहे. त्यासाठी अजितदादांनी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावल्या गेला होता. त्यासाठी दिल्ली येथील विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. एनसीपीने पहिली यादी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीत 11 उमेदवार
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात बुराडी येथून रतन त्यागी, बादली मतदारसंघातून मुलायम सिंह, मंगोल पूरी येथून खेम चंद, चांदनी चौकातून खालीद उर रहमान, बल्लीमारन येथून मोहम्मद हारून, छतरपूर येथून नरेंद्र तंवर, संगम विहार मतदार संघातून कमर अहमद, ओखला येथून इमरान सैफी, लक्ष्मी नगर मतदार संघातून श्री नमा, सीमा पूरी मतदारसंघातून राजेश लोहिया, गोकल पूरी येथून जगदीश भगत यांना मैदानात उतरवले आहे.
दिल्ली येथील विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. एनसीपीने पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 11 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या यादीत 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. अजून इतर मतदारसंघात सुद्धा उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. पुढील यादीत ही नावं पुढे येतील.
असा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 2 टक्के जागा गरजेच्या आहेत. म्हणजे जवळपास 11 खासदार असणे आवश्यक आहे. तर चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असेल तरीही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवता येतो. त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6 टक्के मत अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. किमान तीन सदस्यांचे तरी प्रतिनिधीत्व विधानसभेत असणे आवश्यक आहे.