Ajit Pawar News : डबल इंजीन सरकारला आणखी एक डबा जोडला, राजकीय भुकंपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया
अजीत पवार यांनी सत्तेच्या नावेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येण्यास सुरू झाल्या आहे. मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझ शरद पवारांना उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अपल्या सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा दुसरा रादकीय भुकंप आहे. अजीत पवार यांच्या सह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्री (NCP MLA) पदाची शपथ घेतली. तर अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान या शपथ विधीला आमचा पाठींबा नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या राजराकणार घडलेल्या या मोठ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिलेली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अजीत पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचीठ्ठी देऊन भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी केल्यानंतर उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रतिक्रीया दिली आहे. डबल इंजीनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. आता या सरकारचा विकास बुलेट ट्रेनच्या गतीने होईल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांची प्रतिक्रीया
अजीत पवार यांनी सत्तेच्या नावेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येण्यास सुरू झाल्या आहे. मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझ शरद पवारांना उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला. शरद पवारांची पहिली टिम रवाना झाली आहे, लवकरच दुसरीही टिम त्या दिशेने जाईल असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. थोडक्यात राज ठकरे यांचा इशारा हा शरद पवारांकडे असल्याचा दिसतो.
अजीत पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा
अजीत पवारांना राष्ट्रवादीच्या 40 पेक्षा आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसरा मोठा पक्ष फोडण्यास यशस्वी झाले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांसारखे नेते अजीत पवारांसोबत गेल्याने पक्ष बंडखोरीची कारवाई टळेल का अशी चर्चाही आहे.