छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं विधान करण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांनी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली…

मी वादग्रस्त विधान केलेलंच नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली बाजू मांडली आहे. काय म्हणालेत? पाहा...

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं विधान करण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांनी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली...
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 3:39 PM

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत (Chhatrapati Sambhaji Maharaj) विधिमंडळ अधिवेशनादरम्यान एक विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला.भाजपने अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनं केली. त्यानंतर अजित पवार यांनी आपण काहीही चुकीचं बोललेलो नाही. तर महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय केलं? याची यादी वाचून दाखवली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी दिला आहे. 11 मार्च 2022 मध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या नावाने शौर्य पुरस्कार करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी 279 कोटी 24 लाखाच्या कामाला मान्यता दिली गेली.

शिरूर मतदारसंघात कामाला लागलो. तुळापुरबाबत जी आर निघाला. प्रत्येक ठिकाणी स्वराज्य रक्षक असाच उल्लेख आहे. 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. त्यांनी केलेलं कार्य कुणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत चुकीचं विधान करण्याचा प्रश्नच नाही, असंही अजित पवार म्हणालेत.

काही आमदार खासदार यांनी मला सांगितलं की, दादा तुमच्या विरोधात आंदोलन करायला सांगितलं आहे. त्यांना ऑफिस ला फोटो पाठवायला लावले, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

जेव्हा मी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत बोललो. तेव्हा कुणीही आक्षेप घेतला. कारण त्यावेळी सगळं घडवून आणणारा त्यांचा मास्टर माईड तिथं नव्हता. त्यामुळे तिथं आक्षेप घेण्यात आला नाही. नंतर मात्र त्यावर आक्षेप घेतला गेला.नंतर आंदोलनं केली गेली, असं अजितदादांनी सांगितलं.

विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक विधान केलं. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणं चूक आहे. ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवार म्हणाले. त्यावरून वाद निर्माण झालाय.

मी चुकीचं विधान केलेलं नाही. मी जे बोललो त्यात काहीही चुकीचं नाही, असं अजित पवार म्हणालेत.

मी कधीच महापुरुष यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करायचा भाजपला अधिकार नाही. मी चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माझ्याविरोधात बोलण्याचा आणि आंदोलनं करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अजित पवार म्हणालेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.