Ajit Pawar on Devendra Fadnavis : पत्नी म्हणते नवरा वेश बदलून जायचा, नेते म्हणता आमचा संबंध नाही, अजित पवारांची उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
Ajit Pawar on Devendra Fadnavis : निधी वाटपाच्या बाबतीत झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच उदाहरण देत वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या योजनांचा दाखला दिला.
पुणे : ‘माझा नवरा वेश बदलून बाहेर जायचा, असे एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितले आणि तेच नेते म्हणत होते की, यात आमचा काहीही संबंध नाही आहे,’ असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगतिलं. यावेळ अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील विधानाची आठवण करून देत. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वेश बदलून जायचे असं म्हटलं होतं. यानंतर याची प्रचंड चर्चा झाली. कारण, यापूर्वी भाजपनं हे कधीही मान्य केलं नव्हतं. दरम्यान, यावरच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोट ठेवलंय.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यामध्ये धाकधूक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात धाकधूक असल्यानं त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार पुढे ढकलला आहे. 11 तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत, असंही पवार यावेळी म्हणालेत.
आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा
ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे, अशी सर्वांचीच भूमिका आहे. ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात की नाही याबाबतचा निर्णय सोमवारी मुंबईत एकत्र बसून घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच उदाहरण
निधी वाटपाच्या बाबतीत झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच उदाहरण देत वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या योजनांचा दाखला दिला. निर्णय घेण्याचा अधिकार जिथे असतो तिथे त्यांनी थोडेसे झुकते माप दिले तर त्याबद्दल चुकीचे काही आहे असे नाही. लोक दोन्हीकडून बोलतात. संधी मिळूनही जर मतदारसंघासाठी काही केले नाही तर तिकडूनही बोलले जाते आणि मतदारसंघासाठी काही केले तर त्यावरही टीका केली जाते. त्यामुळे या टीकेला आपण फारसे महत्व देत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले