पंकजांबद्दल बोलताना धनंजयचा हुंदका ग्लिसरीनचा नव्हता, तरीही… : अजित पवार

मी धनंजयची पत्रकार परिषद पाहिली. तो बोलताना भावनिक झाला. त्याच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. काही जण ग्लिसरीन घालून काढतात, पण तो बोलत असताना त्याला दाटून आलं, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

पंकजांबद्दल बोलताना धनंजयचा हुंदका ग्लिसरीनचा नव्हता, तरीही... : अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 1:35 PM

बारामती : राज्यभरात विधानसभा निवडणुकांसाठी 288 मतदारसंघात मतदान सुरु असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगलेल्या नाट्यावर भाष्य केलं आहे. पंकजांबद्दल बोलताना धनंजय यांना आलेला हुंदका ग्लिसरीनचा नव्हता, तरीही त्या क्लिपची सत्यता तपासून पाहायला हवी, असं स्पष्ट मत अजित पवार (Ajit Pawar on Dhananjay Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दोघांमध्ये विस्तवही जात नसताना परळी मतदारसंघातील या हायव्होल्टेज ड्रामाला वेगळंच वळण मिळालं.

‘भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा पाहिली, तर रक्षाबंधन या सणाला महत्त्व आहे. भावाला राखी बांधून भावाने बहिणीचं रक्षण करायचं वचन द्यायचं असतं. त्याचप्रमाणे दिवाळीत भाऊबीज हा महत्त्वाचा सण येतो. नुसतं या सणांपुरतं मर्यादित न राहता बहीण भावाने हे नातं कायम जपायला हवं. कारण आई-मुलानंतर जर कोणाचं पवित्र नातं असेल, तर ते बहीण भावाचं असतं. कारण पहिल्यापासून ते एकाच घरात वाढलेले असतात. सुखदुःखाच्या काळात बहीण-भाऊ एकमेकांकडे जातात. त्यांनी नेहमी एकमेकांना साथ देण्याची परंपरा जपावी, ठेच पोहचवू नये.’ असं बहीण-भावाच्या नात्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले.

मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंसाठी दिल्लीतून मोठं वृत्त, जमीन घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

‘धनंजयशी मी काल बोललो. मी आक्षेपार्ह विधान केलं नाही, असं तो म्हणाला. मी त्याची पत्रकार परिषद पाहिली. तो बोलताना भावनिक झाला. त्याच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. काही जण ग्लिसरीन घालून काढतात, पण तो बोलत असताना त्याला दाटून आलं. मी त्याच्या बहिणीची पण पत्रकार परिषद पाहिली. दोघंही आपापली भूमिका सांगत आहेत’ असं अजित पवार ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना (Ajit Pawar on Dhananjay Pankaja Munde) म्हणाले.

‘हे राजकीय षडयंत्र आहे की मतदारांना खेचण्याचा डाव आहे, हे शोधण्यासाठी लॅबमध्ये शहानिशा करायला हवी. मी जितकं धनंजयला ओळखतो, जर त्याने खरंच आक्षेपार्ह विधान केलं असतं, तर तो म्हणाला असता की तसं घडलं. परंतु तो म्हणतो की मला जीवन संपवावंसं वाटतं, मी इतक्या खालच्या पातळीवर जाणार नाही, त्याअर्थी नक्कीच त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल. यानिमित्ताने सर्वच बहीण भावंडांना नातं घट्ट जपण्याचं आवाहन करतो.’ असंही अजित पवार (Ajit Pawar on Dhananjay Pankaja Munde) म्हणाले.

धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण

“मी 17 ऑक्टोबरला सभेत जे बोललो त्यात एडीट करुन काही लोक आम्हा बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत. मागील 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मात्र कधीही असं बोललो नाही. या घटनेने मन पिळवटून निघालं. मी माझ्या सख्या बहिणींकडून आधी राखी बांधली नाही, पण पंकजा आणि प्रितमकडून बांधली. याआधीही दोन भावांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम मी आजही भोगतो आहे. आमचं रक्ताचं नातं आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात कोण विष कालवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या खोलात जाणार. मी अनेक निवडणुका जिंकलो आणि हरलो. मात्र, कधीही कुणाविषयी असं व्यक्तिगत बोललो नाही.” असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं होतं.

धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा

पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाच्या आरोपानंतर रात्री उशिरा धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं. धनंजय मुंडे यांचं वक्तव्य अशोभनीय आणि लज्जा उत्पन्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केली (Ajit Pawar on Dhananjay Pankaja Munde).

संबंधित बातम्या :

गोपीनाथ मुंडे असते, तर कुणाची असं बोलण्याची हिंमत झाली नसती : प्रीतम मुंडे

धनंजय मुंडेंनी आरोप केलेले पंकजा मुंडेंचे नवे भाऊ कोण ?

फार वेदना झाल्या; मला जग सोडून जावंस वाटत होतं : धनंजय मुंडे

पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा आरोप, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

पंकजा मुंडे भर सभेत स्टेजवर कोसळल्या, डॉक्टर काय म्हणाले?

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.