नाशिक : मी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या थंडीत भल्या पहाटेच हास्याचे कारंजे उडवले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावल्याने आयोजकांचीही तारांबळ उडाली. (Ajit Pawar on Early Morning Oath Ceremony)
माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. नाशिक, धुळे, जळगावस अहमदनगर. मला आमदार सांगत होते. काही जण चर्चा करत होते, मी सकाळी इतक्या लवकर येईन का, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजित पवार दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी अजित पवारांनी नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या साथीने सकाळी सात वाजता घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथ सोहळ्याची आठवण काढली.
पेपर मध्ये उलटसुलट बातम्या येतात, की माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरु आहेत, छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांचा खुर्चीवरुन वाद झाला, मात्र हे खोटं आहे. सरकार चालण्यासाठी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. बातम्या येत असल्या तरी लक्षात ठेवा कोणी तरी चावटपणा करत आहे. माझ्यामुळे जे सुर्यमुखी आहेत, त्यांना त्रास झाला. त्याबद्दल अजित पवारांनी माफी (Ajit Pawar on Early Morning Oath Ceremony) मागितली.
एकत्र आलेल्या पक्षांची विचारधारा वेगळी आहे, मात्र समाजाच्या भल्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं.
रिक्त जागा भरणार
महाराष्ट्रात अनेक रिक्त जागा भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जलसंपदा, महसूल, सार्वजनिक आरोग्य विभागात 60 ते 70 हजार जागांची भरती करणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. मुलं-मुली या वयात अनेक प्रलोभनांच्या आहारी जातात. मात्र आम्ही कौशल्य विकासाचा कार्यक्रम हातात घेतला आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.
‘बळीराजाला दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दरवर्षी कर्ज फेडणाऱ्यांना काही ना काही देण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
त्रुटी दाखवून द्या
सरकारमध्ये आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यासारख्या योजना सुरु केल्या. या योजनेत जर काही त्रुटी राहिल्या तर लक्षात आणून द्या, सुधारणा करु, असं अजित पवार मोकळेपणाने म्हणाले.
मराठी आपली मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीत लिहिता-वाचता आलं पाहिजे, अशी ताकीदच अजित पवारांनी दिली. त्याचवेळी थोडं सबुरीने घ्या, घडी व्यवस्थित बसू द्या, अशी विनंती महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना अजितदादांनी दिली.
देशात आज काही वेगळ्या समस्या आहेत. सीएए एनआरसी सारखे कायदे येत आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांना काहीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी (Ajit Pawar on Early Morning Oath Ceremony) दिली.
संबंधित बातमी :
राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार का? अजित पवार म्हणतात…