“तुमचे नोकर आहोत का?, बाबाची पेंड आहे का?”, मंत्र्यांच्या दमदाटीचा अजितदादांकडून शेलक्या शब्दात समाचार

अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर टीका केली आहे. वाचा....

तुमचे नोकर आहोत का?, बाबाची पेंड आहे का?, मंत्र्यांच्या दमदाटीचा अजितदादांकडून शेलक्या शब्दात समाचार
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 12:41 PM

योगेश बोरसे, प्रतिनिधी, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्री (Eknath Shinde) आणि आमदारांवर टीका केली आहे. धकम्यांचे फोन आणि वापरल्या जाणाऱ्या भाषेवर त्यांनी भाष्य केलंय. पुण्यात काल धुवाधार पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत अजित पवार (Ajit Pawar ) यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील समस्यांवर बोलतानाच त्यांनी मंत्र्यांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचाही समाचार घेतला.

शिंदे सरकारला आता शंभर दिवस पूर्ण झालेत. नव्याचे नऊ दिवस असतात. पण लोकप्रतिनिधी कशीही भाषा वापरू लागले आहेत. अपण काय बोलतो याचं तारतम्य बाळगलं जात नाही. “आम्ही तुमचे नोकर आहोत का?, बाबाची पेंड आहे का?”, असं बोललं जातं. अशी भाषा लोकप्रतिनिधीनी वापरणं योग्य नाही.

काही मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्या क्लिप नक्की कुणाच्या आहेत? हे कळायला हवं. मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी तर अशा क्लिप व्हायरल करत नाही ना हे ही पाहायला हवं आणि जर खरोखरच ती क्लिप व्हायरल होत असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे.

काम नाही का रे तुम्हाला, दिवसभरातून पाचशे फोन लावता. परीक्षा रद्द केलीय फोन ठेव, अशी भाषा वापरणं योग्य नाही, असंही अजित दादा म्हणालेत.

पुण्यात काल झालेल्या पावसावरही अजित बोलले. कालच्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झालंय. रस्त्यारस्त्यावर पाणी साचलं. दगडूशेठ मंदिरातही पाणी शिरलं. लोकांचे हाल झाले, असंही अजित पवार म्हणालेत.

अनेक धरणं भरल्याची माहिती आहे. जर या धरणांमधून पाणी सोडणार असतील तर नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जावा. लोकांना कल्पना देऊनच पाणी सोडलं जावं, असंही अजित पवार म्हणालेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.