नाराजीच्या वृत्तावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण, सत्य परिस्थिती सांगत म्हणाले…
नाराजीवर अजित पवार म्हणतात....
मुंबई : काही दिवसांआधी शिर्डीत राष्ट्रवादीचं (NCP) शिबीर पार पडलं. या शिबीरादरम्यान अजित पवार दिसले नाहीत. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याचं बोललं गेलं. त्यावर अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. या शिबीरादरम्यानच्या काळातच माझा बाहेरचा दौरा आयोजित होता. तो कौटुंबिक पातळीचा दौरा होता. त्याला मला नकार देता आला नाही. या नंतर लगेच माझ्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या. पण त्यात काहीही तथ्य नाही, असं म्हणत आपण नाराज नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांआधी शिर्डीत राष्ट्रवादी ‘मंथन-वेध भविष्याचा’ हे शिबीर पार पडलं. यावेळी अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यावर अजित पवार बोलते झाले. आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
यावेळी बोलताना त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. सत्तेता गैरवापर होता कामा नये. सत्ता आज असते, उद्या नसते. पण शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याला दारू पिता का? असं थेट विचारणं योग्य नाही. अब्दुल सत्तार ज्या प्रकारे बोललेत ते चुकीचं आहे.
सुप्रिया सुळे यांच्याबाबतही अब्दुल सत्तार जे बोलले ते चुकीचं आहे.विनाशकाली विपरित बुद्धी! असं अब्दुल सत्तार यांचं विधान आहे, असं अजित पवार म्हणालेत.