उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ-चाकणकर आमनेसामने, अजित पवारांची याप्रकरणावर तिखट प्रतिक्रिया, म्हणाले….

उर्फी जावेदच्या स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलाय. या सगळ्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ-चाकणकर आमनेसामने, अजित पवारांची याप्रकरणावर तिखट प्रतिक्रिया, म्हणाले....
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 9:37 AM

मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) बोल्ड राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा ड्रेसिंगसेन्स इतर कलाकारांपेक्षा जरा हटके आहे. विविध वस्तू्ंपासून बनवलेले ड्रेस ती परिधान करते. तिच्या ड्रेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. तिच्या या स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून रंगलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.उर्फीच्या कपड्यांवरून महिला-महिलांमध्येच वाद सुरु आहे. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुणी बोललोय का? आम्ही त्यात भाग घेतलाय का? आम्ही तर उलट महिलांना संधी देतोय. पण संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची हे त्यांच्या हातात आहे, असं अजित पवार म्हणालेत.

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उर्फीचा पेहराव योग्य नाही. याचा समाज मनावर परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याची विनंती केली आहे. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

महिला आयोगाने काय करावं हे कुणी दुसऱ्या व्यक्तीने सांगण्याची गरज नाही. कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत. हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.अश्लील या शब्दाची, संकल्पनेची व्याख्या आणि व्यापकता स्थळ आणि काळपरत्वे बदलत राहाते. एखाद्या व्यक्तीने केलेला पेहराव एखाद्या व्यक्तीस अश्लील वाटत असतो. पण इतरांना त्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. शील आणि अश्लीलची सीमारेषा धुसर आहे. महिला आयोग या सगळ्यावर आपला वेळ वाया घालवू शकत नाही, असं रुपाली चाकणकर म्हणालेत.

मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या कपड्यांमुळे राजकारण तापलंय. यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता हे प्रकरण कुठलं नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.