वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक

पुण्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे विधान भवनात दाखल झाले. नेहमीप्रमाणे आजही अजितदादा वेळेआधी बैठकीला हजर झाल्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली. Ajit Pawar

वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक
अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 10:00 AM

पुणे :  पुण्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे विधान भवनात दाखल झाले. नेहमीप्रमाणे आजही अजितदादा वेळेआधी बैठकीला हजर झाल्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली. तसंच नेतेमंडळींचीही दमछाक झालेली पाहायला मिळाली. (Ajit Pawar reached the meeting ahead of time In Pune Over Corona Update)

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक आजोयित करण्यात आलीय. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत.

पुण्यात कोरोना (Pune corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशासन तयारीला लागले आहे. आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येनुसार प्रशासनाची नेमकी काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यासाठी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडत आहे.

पुण्यात नव्याने निर्बंध की मर्यादित स्वरुपाची टाळेबंदी?

पुण्यात वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बैठकीत शहरांत पुन्हा नव्याने निर्बंध लागू करणार की मर्यादित स्वरुपाची टाळेबंदी घोषित करणार, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होणार

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) यांची प्रभावीपणे अंमलबजावणी, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर ब ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक, संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, प्रशासनाची तयारी काय?

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढते आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा वाढत्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स तसेच इतर उपकरणं उपलब्ध करुन  दिले आहेत. तसेच महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक टीममध्ये आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

पुण्यातली कोरोनाची रुग्णांची स्थिती काय?

पुण्यात 17 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 428 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढून 465 नवे रुग्ण आढळले होते. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 527 रुग्ण आढळले होते. म्हणजेच मागील काही दिवसांचा अभ्यास केला, तर पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या पुण्यात 2561 जणांवर उपचार सुरु आहे. यापैकी 160 जण व्हेंटिलेटरवर असून काल दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात काल 414 नवे कोरोना रुग्ण आढळले होते.

(Ajit Pawar reached the meeting ahead of time In Pune Over Corona Update)

हे ही वाचा :

एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे: गिरीश महाजन

गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.