Ajit Pawar : तर त्या दिवशी राज्यातील सरकार कोसळेल; अजित पवार यांचं मोठं विधान

Ajit Pawar : शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री असतात त्यामुळे त्या सरकारला त्यांच्या नावानेच संबोधलं जातं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिंदे सरकार म्हटलं जातं. फक्त युतीच्या काळात जोशी-मुंडे सरकार म्हटलं जात होतं. पण त्यानंतर असं म्हणायची पद्धत बंद पडली.

Ajit Pawar : तर त्या दिवशी राज्यातील सरकार कोसळेल; अजित पवार यांचं मोठं विधान
तर त्या दिवशी राज्यातील सरकार कोसळेल; अजित पवार यांचं मोठं विधानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:51 AM

मुंबई: जोपर्यंत शिंदे सरकारच्यापाठी (shinde government) 145 आमदारांचं पाठबळ आहे. तोपर्यंत हे सरकार चालेल. आम्ही ठाकरेंच्या (thackeray government) नेतृत्वात सरकारमध्ये आलो होतो, तेव्हा पाच वर्ष काय 25 वर्ष सरकार चालणार असं सांगितलं जात होतं. म्हणायला काय जातं? लोकांना बरं वाटायला, कार्यकर्त्यांना बरं वाटायला, मंत्री, आमदारांना बरं वाटायला असं सांगत असतात. पण सर्वांना माहीत आहे, कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत 145 आमदारांचा आकडा त्यांच्या पाठी आहे. तोपर्यंत हे सरकार चालले. ज्यावेळी आमदारांची संख्या कमी होईल, त्या दिवशी हे सरकार गडगडेल, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी केला आहे. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या भवितव्या विषयी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. उद्या 48 पैकी 47 खासदार निवडून आणणार असं भाजपवाले सांगत आहेत. अरे 47 कशाला 48चे 48 निवडून आणणार म्हणा ना. म्हणायला काय जातं? कधीही महाराष्ट्रातील 48 खासदार एका पक्षाचे निवडून आल्याचा इतिहास नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसने 85 पैकी 85 खासदार निवडून आणले होते. हा इतिहास आहे. पण महाराष्ट्रात तसा इतिहास नाही. पण कुणी कितीही वक्तव्य केली तरी महाराष्ट्रातील मतदार विचारी आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्यामुळे राज्यात जे काही मधल्या काळात घडलं ते लोकांना आवडलं नाही. ते निवडणूक झाल्यावर ते दिसेलच, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हलकं, वजनदार खातं असं काही नसतं

शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री असतात त्यामुळे त्या सरकारला त्यांच्या नावानेच संबोधलं जातं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिंदे सरकार म्हटलं जातं. फक्त युतीच्या काळात जोशी-मुंडे सरकार म्हटलं जात होतं. पण त्यानंतर असं म्हणायची पद्धत बंद पडली. कुणाला कोणतं खातं द्यायचं हा शिंदे यांचा अधिकार आहे. कोणतंही खातं कमी नसतं. वजनदार आणि हलकंफुलकं खातं असं काही नसतं. प्रत्येक खात्यात चांगलं काम करता येतं. माझ्याकडे तर एकेकाळी कृष्णाखोरे हे पाच जिल्ह्याचं मंत्रीपद होतं. पण मी ते स्वीकारलं आणि कामही केलं. वजनदार खातं दिलं आणि कर्तृत्वशून्य व्यक्ती बसवला तर त्या खात्याला न्याय मिळत नाही, असंही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात 22-23 लोकं घ्यायची आहेत. काही राज्यमंत्री येतील, काही कॅबिनेट असतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही खाती आपल्याकडे ठेवली असतील, असंही त्यांनी सांगितलं.

वंदे मातरम का? सभागृहात विचारू

आता मंत्रालयात वंदे मातरम म्हणणं सक्तीचं करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे सरकार असताना त्यावेळेस फोनवरून जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. नवीन सरकार आल्यानंतर आता वंदे मातरम बोलले जात आहे. पण आम्ही सभागृहात विचारू की वंदे मातरम कशासाठी वापरले जात आहे. जर योग्य असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.