अजित पवारांनी आठवण सांगितली, मुलीचे दोन मार्क वाढवल्याने मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता!

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना संजय राठोड यांच्याबाबत सातत्याने विचारलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही त्याबाबत विचारण्यात आलं.

अजित पवारांनी आठवण सांगितली, मुलीचे दोन मार्क वाढवल्याने मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता!
Sanjay Rathod, Ajit Pawar
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 5:03 PM

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide) प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने (Maharashtra BJP) लावून धरली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला 12 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही संजय राठोड यांनी आपली बाजू मांडली नाही. इतकंच नाही तर संजय राठोड अजूनही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना संजय राठोड यांच्याबाबत सातत्याने विचारलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही त्याबाबत विचारण्यात आलं. (Ajit Pawar recalled that the minister Shivajirao Patil Nilangekar had to resign after increasing his daughters two marks!)

त्यावर अजित पवार म्हणाले, “पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी कशी करावी, काय करावी हे मी सांगू शकत नाही. मी गृहमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही पत्रकार नेहमी याबाबत विचारतात, पण मी नेहमी सांगतो, चौकशी चालू आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल”.

चौकशी होईपर्यंत बाजूला राहिलं पाहिजे, नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा प्रश्न अजित पवारांना विचारला.

त्यावर अजित पवार म्हणाले, “तसं मग लालबहादूर शास्त्रींनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता. पण आता लालबहादूर शास्त्रीजींशी तुलना होऊ शकते का? त्या त्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पूर्वीच्या काळात मला माहितीय, मी त्यावेळी राजकारणात नव्हतो, केवळ कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामा द्यावा लागत होता. घरातल्या मुलीचे दोन मार्क वाढवले, तरी राजीनामा द्यावा लागत होता. अशा गोष्टी मागे झालेल्या आहेत. आता काय होतंय, काय घडतंय हे आपण पाहतोय.

धनंजय मुंडे समोर येऊन बोलले, मात्र संजय राठोड अजून बोलत नाहीत. नॉट रिचेबल आहेत? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, बरोबर आहे, माझी भेट झाल्यावर मी सांगेन, सगळे पत्रकार तुमची अतिशय आत्मीयतेने वाट बघत आहेत, एक प्रेस घ्या असं सांगेन.

मुलीच्या दोन गुणांसाठी राजीनामा द्यावा लागलेले मंत्री कोण?

अजित पवार यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर माजी मंत्र्यांचा दाखला दिला. ते मंत्री म्हणजे माजी दिवगंत मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर.  शिवाजीराव निलंगेकर हे 1985 ते 86 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता.

एमडी परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता, त्यांचा कार्यकाळ सर्वात अल्प मानला जातो.

VIDEO : अजित पवार काय म्हणाले?

संबंधित बातम्या   

Shivajirao Patil Nilangekar | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.