अजित पवार माझ्या संपर्कात नाहीत : गिरीश महाजन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवार माझ्या संपर्कात नाहीत : गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 7:30 PM

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar resigns) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. राजीनामा योग्य फॉरमॅटमध्ये असल्याने तो मंजूर केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार हे माझ्या संपर्कात नाहीत, त्यांच्या भाजप प्रवेशाचा प्रश्न नाही, असं स्पष्ट केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“अजित पवारांनी राजीनामा का दिला हे मलाही कळत नाही. त्यांच्यात घरातले वाद आहेत की पक्षातले वाद आहेत का, हे तेच सांगू शकतील. आताच निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. अजित पवार साताऱ्यातूनही लोकसभा लढवण्याची शक्यता कमी आहे. जरी ते लढणार असतील तरी आमदारकीच्या राजीनाम्याची गरज नाही. पण खरं कारण तेच सांगू शकतात. अजितदादा माझ्या संपर्कात नाहीत, ना मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना पक्षात घेण्याचाही प्रश्न नाही. पक्षांतर्गत किंवा कौटुंबीक कुरघोड्या आहेत की ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हे मी काही सांगू शकत नाही. हा विषय संभ्रमात टाकणारा आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या राजीनाम्याचं गूढ आहे. विधानसभा समारोपाच्या टप्प्यावर आहे. आता कोणतेही अधिकार नाहीत. आचारसंहिता आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला, हे कटप्पाने बाहुबलीला क्यू मारा या प्रश्नाइतकंच गूढ आहे. पक्षाची बिकट अवस्था, हताश मनातून, एखादा क्षण येतो वैराग्याचं जीवन जगावं वाटतं, असं कारण असू शकतं. आता राजीनाम्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अजित पवारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.