Ajit Pawar: जे होईल ते बघू, विधानसभा बरखास्तीच्या चर्चेवर अजित पवारांची भूमिका-सूत्र

रोखठोक भुमिकेसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभा बरखास्तीबाबत ही स्वाभाविक प्रतिक्रिया दिली. जे होईल ते बघू अशी सरळधोक भूमिका त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar: जे होईल ते बघू, विधानसभा बरखास्तीच्या चर्चेवर अजित पवारांची भूमिका-सूत्र
नो कमेंट्स, अजित पवारांची प्रतिक्रियाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:05 PM

राज्यातील संधोपसंधीमध्ये ही महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी रोखठोक भूमिका दाखवली आहे. शिवसेनेतील (Shivsena) एका गटाने बंडाळी केली असली तरी त्याचा आघाडीवर कसला परिणाम झाला नसल्याचे नेते दाखवत आहेत. बुधवारी कॅबिनेटची बैठक (Cabinet Meeting) झाली. त्यावेळी ही बैठक वादळी ठरण्याचा अंदाज व्यक्त होत होता. परंतू असे काहीही बैठकीत घडले नाही. मुख्यमंत्री बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. अनेक मंत्री या बैठकीत अनुपस्थित असले तरी आघाडीतील प्रमुख मंत्री या बैठकीला हजर होते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सरकार बरखास्तीवर कसला ही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर अजित दादांनी सरकार बरखास्तीवर स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त केली. जे होईल ते बघू, असे म्हणत प्राप्त परिस्थितीला शरण जातं सामोरं जाण्याची रोखठोक भूमिका त्यांनी व्यक्त केली.

नो कमेंट्स

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा पुकारल्याने आघाडी सरकारवर दोन दिवसांपासून संकटाचे ढग जमा झाले आहे. त्यांचे बंड यशस्वी झाल्यास आघाडी सरकार अडचणीत येणार आहे. सरकार केव्हाही कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही नेते बंड शमवण्यासाठी तयारी करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सत्तांतर नाट्यावर शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेहमी माध्यमांशी दिलखुलास बोलणारे अजितदादा यावेळी मात्र फारसे खुलले दिसले नाहीत.

हे सुद्धा वाचा

मुखमंत्र्यांच्या चेह-यावर तणाव नाही

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी त्यांच्या चेह-यावर कुठलाही तणाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती बैठकीत उपस्थित मंत्र्यांना दिली. तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी विचारणा केली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ही बैठक नेहमीप्रमाणे झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच मास्क लावणे आवश्यक असल्याचे सांगितले.

एकही आमदार फुटला नाही

आजच्या घटनावर सरकार स्थिर असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. 44 आमदार सोबत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेसचा एक ही आमदार फुटलेला नाही. सर्व आमदार सोबत आहेत असा वारंवार उल्लेख त्यांनी केला.

बैठकीतील निर्णय

नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच इतर काही निर्णय ही घेण्यात आले. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असंच सहकार्य असू द्या अशी भावनिक साद घातली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.