पुणे : राज्यात सध्या हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या तीन मुद्द्यांवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता अजितदादा यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. ‘मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं दानवे म्हणाले होते. त्यावर आता ‘मुख्यमंत्री (Chief Minister) कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते’, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ‘मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते. महिलाही मुख्यमंत्री होऊ शकते, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145 चं बहुमत आणा आणि राज्याचं प्रमुख व्हा. असं कुणी काहीही सांगेन, की अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं. अरे त्यांनी 145 आमदार त्यांच्या पाठिशी उभे केले तर होतील ना ते मुख्यमंत्री किंवा ती व्यक्ती’, असं अजित पवार म्हणाले.
रावसाहेब दानवे हे 3 मे रोजी परशुराम जयंती निमित्त जालना येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते.
त्यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, ‘मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम देखील ब्राम्हण समाजाने केले’, असं रानवे म्हणाले होते.
धर्म एवं न्याय के मार्ग का अनुसरण करने वाले, भगवान विष्णु जी के अवतार, ज्ञान, शक्ति, साहस व शील के प्रतीक भगवान श्री परशुराम जी की जयंती की आप सबको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।#ParshuramJayanti2022 pic.twitter.com/8zjsxcHOHb
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) May 3, 2022
अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केलीय. महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. सरकार कायद्याने चालतं. अल्टिमेटम दिला तर गृहमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. मी एका भाषेत बोललो होतो की उद्या सगळ्यांना निर्णय बंधनकारक आहेत. वेगवेगळ्या समाजाला तो नियम लागू असेल. आम्ही सांगतो होतो की अशी भाषा करु नका, कारण कायद्याने, नियमानं राज्य चालतं. जो काही निर्णय होईल तो सर्वांना बंधनकारक असेल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.