दिवाळीत पुन्हा भूकंप, अजित पवार शांत बसणार नाहीच; अंजली दमानिया यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

अजित पवार यांची परिस्थिती यांची ना घर का ना घाट का झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही. येत्या काळात अजित पवार हे आपल्या आमदारांना एकत्र करतील आणि मोठा...

दिवाळीत पुन्हा भूकंप, अजित पवार शांत बसणार नाहीच; अंजली दमानिया यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ
anjali damaniaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 6:30 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूकंप टाळला गेला आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांनाही चेकमेट बसला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही. या संदर्भात अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही. येत्या काही दिवसात, महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा दगाफटका करतील यात शंका नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

अजितदादांनी भलतच केलं

शरद पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस स्टोरी आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

राजकारणाचा उकीरडा

सुप्रिया सुळे या राष्ट्रीय लेव्हलला बघतील आणि अजित पवार राज्य सांभाळतील असं या दोघांना समजावण्यात आलं. पण 2 मे रोजी शरद पवार यांनी भलताच निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाण्याचा प्लॅन त्यांनी रचला होता. पण ते तोंडघशी पसरल्यासारखे झाले आहेत. परंतु आता राजकारणाचा उकीरडा झाला आहे, असं मला वाटतंय, असंही त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.