मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची खुर्ची रिकामी
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawars deputy CM chair vacant) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालेले भूकंपाचे हादरे अजूनही बसत आहेत.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawars deputy CM chair vacant) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालेले भूकंपाचे हादरे अजूनही बसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी कामकाजाला सुरुवातही केली. त्याचवेळी अजित पवार (Ajit Pawars deputy CM chair vacant) हे सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारण्यासाठी आज सकाळी घरातून विधीमंडळात गेले. मात्र त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही.
मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही ठोकली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे.दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी खुर्ची राखीव होती. मात्र अजित पवारांची खुर्ची रिकामी असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. अजित पवार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने ही खुर्ची रिकामी दिसली.
मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
हवामान बदलाच्या अनुषंगाने करायाचे उपाय आणि पूर तसेच दुष्काळ प्रबंधन या जागतिक बँकेच्या मदतीने प्रस्तावित प्रकल्पाबाबत जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी, एक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
सुमारे 3500 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून, यातील 350 कोटी रूपये हे तांत्रिक सहाय्यापोटी आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा प्रकल्प सुद्धा यात अंतर्भूत आहे. सुमारे 10 हजार गावांमध्ये 20 लाख शेतकर्यांना कार्पोरेट्सच्या मदतीने उत्तम बाजारपेठ सुविधा पुरविण्याच्या स्मार्ट व्हीलेज प्रकल्पासंदर्भात सुद्धा यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली.
पदभार न स्वीकारताच अजित पवार घरी
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी (Ajit Pawar Returns without taking charge) परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत शनिवारी (23 नोव्हेंबर 2019) भल्या सकाळी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या मनधरणीचे अतोनात प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी आजही तीन-चार तास चर्चा केली. या मनधरणीचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या सुप्रीम कोर्टात महानिकाल
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली आहेत .(MahaVikas Aaghadi in Supreme Court). महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Government formation) महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?
विश्वासदर्शक ठराव तातडीने होणार की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.