आसाममध्ये अडकलेले तरुण अखेर महाराष्ट्रात दाखल होणार, अजित पवारांच्या पुढाकारानं सुटका
80 तरुणांना आसाममधून सोडण्यात आलं आहे. हे तरुण रेल्वेद्वारे महाराष्ट्रात येत असून ते उद्या किंवा परवा राज्यात दाखल होणार आहे. या तरुणांची कोरोना चाचणी करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच हे तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना एका कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना मोठ्या असुविधांना सामोरं जावं लागत होतं.
मुंबई : लष्करी भरतीसाठी (Army Recruitment) आसाममध्ये गेलेले आणि तिथेट अडकून पडलेल्या तरुणांची अखेर सुटका होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर या तरुणांची सुटका होणार आहे. एकूण 80 तरुणांना आसाममधून सोडण्यात आलं आहे. हे तरुण रेल्वेद्वारे महाराष्ट्रात येत असून ते उद्या किंवा परवा राज्यात दाखल होणार आहे. या तरुणांची कोरोना चाचणी करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच हे तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना एका कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना मोठ्या असुविधांना सामोरं जावं लागत होतं.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातून अनेक तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली इथून सोडवणूक करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या तरुणांनी एक व्हिडीओ काढून तिथल्या परिस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्नही केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार आसाममध्ये लष्करी भरती प्रक्रिया 7 आणि 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे ते अडीचशे तरुण 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दीपू शहरात दाखल झाले. तिथे त्यांची भरती प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, भरतीपूर्वी या तरुणांची कोरोना रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी अन्य मुलांनाही कॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं.
खाण्याची आबाळ, अन्य आजार जडण्याची भीती
कॉरंटाईन सेंटरमध्ये या मुलांना जेवण, पाण्यासह अन्य सुविधा मिळत नव्हत्या. दीपू हे थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. असं असताना या मुलांना पांघरायला चांगल्या शॉल किंवा अन्य काहीही देण्यात आलेलं नव्हतं. अशावेळी कोरोनाचं संकट असल्यानं या मुलांना अन्य आजार जडण्याची शक्यताही होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने याची दखल घेऊन या तरुणांना राज्यात परत आणण्याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.
इतर बातम्या :