Maharashtra Assembly Session 2022: गिरीशचं रडणं अजून बंदच होईना, डोक्याचा फेटा डोळ्याला लावून पाणी पुसतोय, अजितदादांची ॲक्शन करत टोलेबाजी
राजकीय नाट्यादरम्यान आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असे चित्र निर्माण झाले होते. पण ऐन वेळी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले ती जनता होती पण जे दु:ख झाले ते भाजपा नेत्यांनाच. यामुळे अनेक भाजप नेत्यांची निराशा झाली. पण पक्षापुढे कुणाचे काहीच चालत नाही. त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश आता सर्वांनीच मान्य केला असला तरी यातून अजूनही भाजपाचे नेते सावरलेले नाहीत.
मुंबई : मुख्यमंत्रीपदी (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांची निवड ही राज्यासाठी तर आश्चर्याची बाब होती पण सर्वाधिक धक्का हा भाजापातील नेत्यांनाच बसलेला आहे. (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर कमालीचे वातावरण झाले होते. नेमका हा निर्णय झालाच कसा यामधून आणखी कोणी सावलेले नाहीत. सर्वात जास्त दु:ख हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कायम होते त्यांना झाल्याचा टोला (Ajit Pawar) आ. अजित पवार यांनी लगावला आहे. महाराष्ट्रासाठी तो शॉक असला तरी यामधून गिरिश महाजन तर अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळेच डोक्याला बांधलेल्या फेट्यानेच ते डोळ्यातील पाणी पुसत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. म्हणजेच या निवडीमुळे भाजपामध्ये देखील अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचेच अजित पवार यांना दाखवून द्यायचे होते. तर भाजपाच्या पहिल्या फळीतील नेते हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधलेच असल्याचे सांगत गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठ असलेल्यांचे काय हाल आहेत हे देखील पवार यांनी सांगितल्यानंतर सभागृहात एकाच हशा झाला.
अनेकांची निराशा, पण नाईलाज
राजकीय नाट्यादरम्यान आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असे चित्र निर्माण झाले होते. पण ऐन वेळी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले ती जनता होती पण जे दु:ख झाले ते भाजपा नेत्यांनाच. यामुळे अनेक भाजप नेत्यांची निराशा झाली. पण पक्षापुढे कुणाचे काहीच चालत नाही. त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश आता सर्वांनीच मान्य केला असला तरी यातून अजूनही भाजपाचे नेते सावरलेले नाहीत. शिवाय इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांना जाबाबदारी आणि पदे मिळत आहेत यामुळे देखील अनेकजण नाराज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पण पक्षाची ध्येय-धोरणे ही ठरलेली आहेत. त्यामुळे नाराज असूनही सांगायचे कुणाला अशी भाजपा नेत्यांची अवस्था झाली आहे.
भाजपा आमदारांमध्ये नाराजी
राजकीय नाट्यापेक्षा जो शपथविधी झाला तो सर्वांनाच थक्क करणारा होता. यामधून शिंदे गटाला उभारी मिळणार असली तरी भाजपाच्या आमदारांचे काय ? असा सवाल कायम आहे. त्यामुळे भाजपातील 105 आमदारांना मनातून या गोष्टी मान्य नसतील असे अजित पवार यांनी सांगताच एकच गोंधळ उडाला आहे. शिवाय निर्णय मान्य असेलल्या चंद्रकांत पाटलांना देखील अजित पवार यांनी टोला लगावला. दादा अजून आपल्यालाही मंत्रीपद मिळते की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे सर्वच खुश असे होणार नसल्याचे पवार म्हणाले.
बंडखोरांच्या मनातही संभ्रमता
शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करुन वेगळी वाट निवडली. पण आता त्यामधील किती जणांना मंत्रीपद मिळणार हे निश्चित नाही. जो तो मंत्रिपदाबाबत आशादायी आहे. पण भाजपाचे निष्ठावंत, इतर पक्षातून दाखल झालेले आणि हे कमी म्हणून की काय हे बंडखोर 40 त्यामुळे कुणाला पद मिळणार याबाबत प्रत्येकाच्या मनात धास्ती असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे भाजपात आणि शिंदे गटात सर्वकाही अलबेल असे नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला.