अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार राज्यपालांच्या भेटीला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राजभवनात जाऊन पार्थ पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे निवदेनाच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले. पार्थ पवार यांनी हे निवेदन राज्यपालांकडे सादर केलं. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा […]

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार राज्यपालांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राजभवनात जाऊन पार्थ पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे निवदेनाच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले. पार्थ पवार यांनी हे निवेदन राज्यपालांकडे सादर केलं. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहेत. पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यातच पार्थ पवार राजकीय भेटीगाठी घेत असल्याने या चर्चांना जोर आला आहे.

यापूर्वी पार्थ पवार यांनी अधिवेशनाचं कामकाज पाहण्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. शिवाय राष्ट्रवादीच्या अनेक सभा, कार्यक्रमांमध्येही पार्थ पवार पाहायला मिळतात. त्यामुळे पार्थ यांची राजकारणातील एण्ट्री मावळ लोकसभा मतदारसंघातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक लढण्याबाबत पार्थ काय म्हणाले होते?

दरम्यान, पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. “मला असं वाटतं मावळमध्ये मला पहिली दोन वर्ष काम करायला पाहिजे. लोकांना भेटून इथली परिस्थिती, अडचणी नीट समजून घ्यायला हवं. त्यानंतर माझा निवडणुकीला उभं राहायचा प्लॅन होता. पण तुम्ही आताच या असा लोकांचा आग्रह आहे. मी जर उभं राहिलो तर सगळे एकत्र येतील, काय हरकत नाही. दादांचं म्हणणं आहे की तू आला तरच सीट येणार. त्यामुळे बघूया, पक्ष काय म्हणतोय. मावळमध्ये मला उभा राहायचंच आहे असं माझं काही नक्की नाही. पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तरी चालतंय. माझा एकच मुद्दा आहे की इकडचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. लोकांना भेटायचे आहेत, इथे विकास कसा आणायचा त्यापद्धतीने मला काम करायचं आहे”, असं पार्थ पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात…… 

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार    

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…    

राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या ‘या’ 10 जागा जिंकण्याची खात्री  

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.