Satara : शिंदे गटातील नेत्यांवर अजितदादा पुन्हा बरसले, साताऱ्याच्या मेळाव्यात नेमके काय घडले?

खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या आरोपांचा समाचार आता विरोधक घेत आहेत. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात त्याबद्दल तरी अशी वक्तव्य ही शोभा देत नाहीत. असा सूर उमटत आहे.

Satara : शिंदे गटातील नेत्यांवर अजितदादा पुन्हा बरसले, साताऱ्याच्या मेळाव्यात नेमके काय घडले?
विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 7:40 PM

संतोष नलावडे Tv9 मराठी प्रतिनिधी, सातारा : रविवार गाजला तो शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केलेल्या आरोपांमुळे. शंभर खोके हे मातोश्रीवर जात होते असा गंभीर आरोप  केला होता. यावर शिंदे गटातील नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या आरोपाच खरपूस समाचार घे  तला आहे. प्रतापराव जाधवांना हे सर्व माहित होते तर त्याच वेळी का समोर आणले नाही. अशाप्रकारे एखादी गोष्ट लपवणे हा देखील गुन्हाच असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर ज्या पक्षाच्या जीवावर निवडून यायचे त्याबद्दलच अशी वक्तव्ये करणे हे दुर्देवी असल्याचे पवार म्हणाले आहेत.

विरोधकांवर टीकास्त्र करीत स्थानिक पातळीवर होत असलेल्या राजकारणावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत रामराजे हे एकाकी पडलेले नाहीत. जे कोण एकाकी पाडण्याचा प्रयत्न करेल त्याला जशास तसे उत्तर देऊ असा दिलासा त्यांनी दिला आहे.

अमोल कोल्हे हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. पण याला देखील अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. विचार जरी वेगळे असले तरी आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही. माझं पण काही भाजपच्या मंडळींनी कौतुक केलं होते याचा दाखला त्यांनी दिला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगले खाते मिळण्याबाबत जाहीर सभेत वक्तव्य केले होते. मात्र, कोणते खाते द्यायचे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, जे खाते मिळाले त्या खात्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे होणे महत्वाचे असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आरोपाबाबत असं कोणत्याही अधिकाऱ्याने कोणाचही ऐकू नये. सत्ताधारी पक्षांतील नेत्याने जरी चुकीचं सांगितलं तरी त्याच ऐकू नये. जर हे उघडकीस आलं याची मोठी किंमत त्या अधिकाऱ्याला मोजावी लागते. वेळप्रसंगी बडतर्फीचीही कारवाई होते याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या आरोपांचा समाचार आता विरोधक घेत आहेत. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात त्याबद्दल तरी अशी वक्तव्य ही शोभा देत नाहीत. विरोधकांकडूनच नाही तर शिंदे गटातील नेत्यांनीही हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगितले आहे.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.