तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!

Telangana assebmly election result : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे ते भाऊ आहेत. सभेतील वादग्रस्त भाषणं आणि वक्तव्यांमुळे अकबरुद्दीन ओवेसी चर्चेत असतात. अकबरुद्दीन ओवेसींनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. अकबरुद्दीन ओवेसी यांनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून विजय […]

तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

Telangana assebmly election result : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे ते भाऊ आहेत. सभेतील वादग्रस्त भाषणं आणि वक्तव्यांमुळे अकबरुद्दीन ओवेसी चर्चेत असतात. अकबरुद्दीन ओवेसींनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून विजय मिळवल्याचं वृत्त एएनआयने दिलंय. एमआयएमने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आठ उमेदवार उतरवले आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसची सत्ता तेलंगणात येताना दिसत आहे.

तेलंगणा राज्याची 2014 मध्ये निर्मिती झाल्यापासूनच टीआरएस सत्तेत आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित केली होती. नव्याने लागलेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा केसीआर यांनी जवळपास विजय मिळवला आहे.

तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या 119 आहे. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे. सुरुवातीच्या कलांनुसार टीआरएसने हा आकडा कधीच गाठलाय. टीडीपी आणि काँग्रेसने तेलंगणात एकत्र निवडणूक लढवली आहे. तरीही दोन्ही पक्षांना खास कामगिरी करता आली नाही. भाजपलाही नेहमीप्रमाणे दक्षिणेतील आणखी एका राज्याने नाकारलं आहे.

तेलंगणासोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांचीही मतमोजणी होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. काँग्रेसने राजस्थानमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.

LIVE :  पाच राज्यांचे निकाल, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.