सोलापूर : काँगेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आता आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं सांगत भाजपमध्ये जाण्याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे.
आषाढीवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर म्हेत्रे (Siddharam Mhetre) हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. म्हेत्रे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे म्हेत्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं म्हेत्रे यांनी सांगितलं. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी म्हेत्रे यांना भाजप प्रवेशासाठी आग्रह धरला आहे. मला निवडून आणणारी जनता हीच खरी मालक असून त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांचा मला विचार करावा लागेल असं सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोलापुरात उरल्या सुरल्या काँग्रेसला खिंडार पडणार आहे.
कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?