भाजपने वेटिंगवर ठेवलं, काँग्रेस आमदाराला अखेर यू टर्न घेण्याची वेळ

पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घुमजावानंतर आता अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे (Akkalkot Siddharam Mhetre) यांनी आपण काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय.

भाजपने वेटिंगवर ठेवलं, काँग्रेस आमदाराला अखेर यू टर्न घेण्याची वेळ
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 6:57 PM

सोलापूर : सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यासाठी विरोधी पक्षाचे अनेक आमदार इच्छुक (Akkalkot Siddharam Mhetre) असले तरी स्थानिक विरोधामुळे काहींचा प्रवेश होऊ शकला नाही. सोलापूर जिल्ह्यातील आमदारांवरही अशीच वेळ आली. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घुमजावानंतर आता अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे (Akkalkot Siddharam Mhetre) यांनी आपण काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय.

या स्पष्टीकरणामुळे म्हेत्रेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला. मी भाजपमध्ये जाणार असं कधीच म्हणालो नव्हतो, माध्यमांनीच भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगवल्याचं म्हेत्रेंनी म्हटलंय.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत म्हेत्रेंच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधूनही म्हेत्रेंचा पत्ता कट होणार का अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाल्याचा दावा म्हेत्रेंनी केला.

म्हेत्रे हे अक्कलकोटमधून भाजपकडून इच्छुक होते. त्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्कात होते. मात्र म्हेत्रेंच्या प्रवेशाला स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला. त्यामुळे कालपर्यंत भाजपची दारे ठोठावणाऱ्या म्हेत्रेंना आता नाईलाजास्तव स्वपक्षातूनच निवडणूक लढवावी लागणार आहे.

कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?

  • सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपद भूषवलं
  • 1997 च्या पोटनिवडणुकीत अक्कलकोट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार
  • सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत
  • सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
  • सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
  • सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत
  • भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात म्हेत्रेंनी तालुका काँग्रेसमय केला
  • गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाबाबत नाराजी
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.