अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका
अकोला: अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास […]
अकोला: अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते. मात्र अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. त्यामुळे विकासकामं रखडली आहेत. त्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा अकोल्यात आहे. त्याच तणावातून त्यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे.
अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे.
कोण आहेत संजय धोत्रे? संजय शामराव धोत्रे हे भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार आहेत. ते या मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
2004, 2009 आणि 2014 या तीनही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी विजय मिळवला.
संजय धोत्रे यांनी 2014 मध्ये त्यांनी अकोला मतदार संघात विजय मिळवला. त्या निवडणुकीत त्यांना 2 लाख 87 हजार मतं मिळाली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जवळपास 64 हजार मतांनी विजय मिळवला.
संजय धोत्रे 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरही निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभा लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.